• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. host pakistan out from icc champions trophy know about the reasons spl

केवळ दोन सामने खेळून पाकिस्तान गेला चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर, यजमान संघावर का आली ही नामुष्की?

न्यूझीलंडच्या या विजयासह पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधून बाहेर झाला. 

Updated: February 25, 2025 09:45 IST
Follow Us
  • Reaction of Pakistanis on Pakistan Cricket Team defeat
    1/13

    चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद असलेल्या पाकिस्तानचा संघ स्पर्धेच्या अवघ्या ६ दिवसांतच स्पर्धेतून बाहेर झाला आहे. (Photo: PTI)

  • 2/13

    चॅम्पियन्स ट्रॉफीतील सहावा सामना न्यूझीलंडविरूद्ध बांगलादेश यांच्यात खेळवला गेला. न्यूझीलंड संघाने बांगलादेशचा ६ विकेट्सने पराभव केला. (Photo: AP)

  • 3/13

    न्यूझीलंडच्या या विजयासह पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधून बाहेर झाला. (Photo: Pakistan Cricket Team/FB)

  • 4/13

    पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत फक्त दोन सामने खेळला आणि या दोन्ही सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. (Photo: Pakistan Cricket Team/FB)

  • 5/13

    पाकिस्तानला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून ६० धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. (Photo: PTI)

  • 6/13

    तर दुसऱ्या सामन्यात भारताकडून ६ विकेट्स आणि ४५ चेंडू राखून पराभव पत्करावा लागला होता. (Photo: PTI)

  • 7/13

    भारताबरोबर झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानच्या विविध दिग्गजांनी संघाच्या कामगिरीची कारणमिमांसा केली होती. ज्यामध्ये माजी खेळाडू आणि पाकिस्तानच्या चाहत्यांचा समावेश आहे. (Photo: Pakistan Cricket Team/FB)

  • 8/13

    पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर म्हणाला, “पाकिस्तानी संघाबरोबर मागील कित्येक काळापासून हेच होत आहे, पाकिस्तानी खेळाडू नेहमीसारखेच खेळतात, ते वेगळे काही करतच नाहीत. पाकिस्तानचा संघही चुकतो बोर्डही चुकतो. खेळाडूंकडे कौशल्यच नाही, त्यांना रोहित, गिल विराटसारखं खेळताच येत नाही,” अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत. (Photo: PTI)

  • 9/13

    पाकिस्तानी चाहत्यांनी तर संघाविरुद्ध बंड केल्याचं पाहायला मिळालं. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या पराभवाबद्दल पाकिस्तानी चाहते म्हणाले की जेव्हा पाकिस्तानची फलंदाजी फॉर्ममध्ये असते तेव्हा गोलंदाजी काम करत नाही, जेव्हा गोलंदाजी फॉर्ममध्ये असते तेव्हा फलंदाजी काम करत नाही, जेव्हा दोन्ही फॉर्ममध्ये असतात तेव्हा क्षेत्ररक्षण काम करत नाही आणि जेव्हा तिघेही फॉर्ममध्ये असतात तेव्हा पंच फसवणूक करतात. जेव्हा चारही गोष्टी ओके असतात तेव्हा पाऊस सुरू होतो आणि त्यांच्या आशा धुळीस मिळतात.  (Photo: Pakistan Cricket Team/FB)

  • 10/13

    दरम्यान, तब्बल ३० वर्षांनंतर पाकिस्तानला आयसीसी स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली होती. १९९६ मध्ये झालेल्या विश्वचषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. त्यानंतर थेट आता २०२५ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले होते.  (Photo: Pakistan Cricket Team/FB)

  • 11/13

    पाकिस्तानने आयसीसी स्पर्धेचे यजमानपद मिळावे यासाठी बरेच प्रयत्न केले होते. पण घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यांचा पाकिस्तानने बिलकुल फायदा करून घेतला नाही आणि पहिल्या दोन सामन्यात पराभूत होत स्पर्धेतील आपले आव्हान संपुष्टात आणले.  (Photo: Pakistan Cricket Team/FB)

  • 12/13

    इतकंच नव्हे तर पाकिस्तानचा संघ २०१७ मधील चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता संघ होता, म्हणजेच या स्पर्धेतील गतविजेता संघ होता. पण पाकिस्तान आता गट सामन्यांतूनच बाहेर झाला आहे.  (Photo: Pakistan Cricket Team/FB)

  • 13/13

    सलग दोन सामन्यांमधील पराभवाने आता पाकिस्तान आणि बांगलादेशचा संघ गट सामन्यांमधूनच स्पर्धेतून बाहेर झाला आहे. हेही पाहा- ‘सॉरी गांजा थोडा…’; आयआयटीयन बाबा ते अबरार अहमद, भारताच्या विजयानंतर सोशल मीडियावर मीम्सचा महापूर…

TOPICS
क्रीडाSportsचॅम्पियन्स ट्रॉफीपाकिस्तानPakistanपाकिस्तान क्रिकेट टीमPakistan Cricket Teamभारत विरुद्ध पाकिस्तानInd vs Pak

Web Title: Host pakistan out from icc champions trophy know about the reasons spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.