-
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुबई येथे झाला. भारताचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलही हा सामना पाहण्यासाठी दुबईमध्ये गेला होता. (Photo: Rj Mahvash/Instagram)
-
दरम्यान, यावेळी चहलबरोबर एक मुलगी देखील दिसली होती. त्या मुलीचे नाव आरजे महवश आहे, कोण आहे ती चला जाणून घेऊ. (Photo: Social Media)
-
महवश ही मुळची अलीगढ येथील आहे. महवश रेडिओ जॉकी (आरजे) म्हणून लोकप्रिय आहे. एवढेच नाही तर महवश सोशल मीडियावरही सक्रिय आहे. आरजे महवश इन्स्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे आणि लोकांना तिचे व्हिडिओ पाहणे खूप आवडते. १.८ मिलियन लोक तिला फॉलो करतात. याशिवाय ती अभिनेत्रीही आहे. तिने काही वेब सिरीजमध्ये काम केले आहे. तर काही प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. (Photo: Rj Mahvash/Instagram)
-
युजवेंद्र चहल आणि आरजे महवश दुबईमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना पाहण्यासाठी एकत्र आले होते, त्यानंतर ते दोघेही चर्चेचा विषय बनले आहेत. याआधीही चहल या मिस्ट्री गर्लसोबत दिसला आहे. तेव्हापासून दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत आहेत. (Photo: Social Media)
-
यापूर्वी जेव्हा युजवेंद्र चहल आणि आरजे महवाश एकत्र दिसले होते, तेव्हा महवश चहलची नवीन प्रेयसी असल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. (Photo: Yuzvendra Chahal/Instagram)
-
दरम्यान, महवाशने या अफवा निराधार असल्याचे म्हटले होते. तिने चहलला डेट करण्याच्या गोष्टींना मानण्यास स्पष्ट नकार दिला होता. (Photo: Yuzvendra Chahal/Instagram)
-
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झाला, जो भारताने ४ विकेट्सने जिंकला. या विजयानंतर आरजे महवश इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाली, “मी तुम्हाला सांगितले होते की मी जिंकल्यानंतरच परत येईन, मी टीम इंडियासाठी लकी आहे.”
-
दरम्यान, युजवेंद्र चहलचा अलिकडेच धनश्री वर्माबरोबर घटस्फोट झाला आहे. (Photo: Yuzvendra Chahal/Instagram)
युजवेंद्र चहलबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये दिसलेली ‘मिस्ट्री गर्ल’ आहे तरी कोण? भारत जिंकल्यानंतर म्हणाली…
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झाला, जो भारताने ४ विकेट्सने जिंकला. या विजयानंतर…
Web Title: Who is rj mahvash who watch ind vs nz champions trophy 2025 final match with yuzvendra chahal spl