-
आयपीएलच्या १८व्या हंगामाचा थरार आज म्हणजेच २२ मार्चपासून सुरू होत आहे. आयपीएल २०२५ मध्ये अनेक वरिष्ठ आणि अनेक नवे चेहरे एकत्र खेळताना दिसणार आहेत.
-
आयपीएल २०२५ मध्ये एकूण १० संघ सहभागी होणार असून या १० संघांमध्ये ७४ गट टप्प्यातील सामने खेळवले जाणार आहेत. यापैकी ४ उत्कृष्ट संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करतील.
-
२००८ पासून ते २०२५ पर्यंत आयपीएलमध्ये अनेक नवे खेळाडू आले आणि गेले. पण काही चेहरे असे आहेत, ज्यांनी आतापर्यंतचे सर्व १८ सीझन खेळले आहेत. हे चारही खेळाडू भारतीय खेळाडू आहेत.
-
मनीष पांडे – मनीष पांडेने २००८मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. आयपीएलमध्ये शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे. यंदाही हा खेळाडू केकेआरकडून खेळताना दिसणार आहे.
-
एस एस धोनी – आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक महेंद्रसिंग धोनीने चाळिशी पार केली असली तरी तो अजूनही आयपीएलमध्ये खेळत आहे. २०२३ मध्येही त्याच्या नेतृत्वाखाली संघ चॅम्पियन झाला होता. चेन्नई संघाचा खेळाडू असलेला धोनी सीएसकेवरील बंदीमुळे २०१६ आणि २०१७ च्या मोसमात रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला.
-
रोहित शर्मा – रोहित शर्माने डेक्कन चार्जर्स संघातून आयपीएल कारकिर्दीला सुरूवात केली. २०११ मध्ये रोहित मुंबई इंडियन्स संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील केले. कर्णधार म्हणून ५ आणि खेळाडू म्हणून एकूण ६ आयपीएल विजेतेपद पटकावणारा रोहित एकमेव खेळाडू आहे. यंदाही रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघातून खेळताना दिसेल.
-
विराट कोहली – आयपीएलच्या इतिहासात विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे, जो १८ वर्षे एकाच संघाचा भाग राहिला आहे. २००८ मध्ये विराट कोहलीने आरसीबीकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. आयपीएलमध्ये ७००० धावा करणारा विराट एकमेव खेळाडू आहे पण एकदाही त्याच्या संघाने या लीगचे जेतेपद पटकावले नाही.
-
वरील ४ खेळाडूंशिवाय दिनेश कार्तिक, रिध्दीमान साहा आणि शिखर धवन हे खेळाडूही आयपीएलचे १७ सीझन खेळले आहेत. गतवर्षी या तिन्ही खेळाडूंनी व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
IPL All- Seasons Players List: १८ वर्षांच्या आयपीएल इतिहासात सर्व सीझन खेळणारे ४ खेळाडू आहेत तरी कोण? जाणून घ्या
IPL 2008 to 2025 All- Seasons Players : आयपीएलच्या १८व्या सीझनला सुरूवात होत आहे. २००८ मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा जगभरात प्रसिद्ध झाली आहे. दरम्यान आयपीएलच्या या सर्व १८ सीझनमध्ये आतापर्यंत फक्त ४ खेळाडू खेळले आहेत. पाहूया कोण आहेत हे खेळाडू….
Web Title: Indian premier league 4 players who played all 18 seasons of ipl rohit sharma virat kohli ms dhoni manish pandey bdg