• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. mary kom divorce rumors know about her husband onler jshd import asc

मेरी कोम २० वर्षांनंतर पतीपासून विभक्त होण्याच्या चर्चा; जाणून घ्या तिच्या नवऱ्याबद्दल

मेरी कोम तिच्या मुलांसह फरिदाबादमध्ये राहत आहे तर ऑन्लर त्याच्या कुटुंबासह दिल्लीत वास्तव्यास आहे

Updated: April 12, 2025 16:36 IST
Follow Us
  • mary kom divorce
    1/9

    भारताची सर्वात यशस्वी बॉक्सर आणि ऑलिम्पिक पदक विजेती मेरी कोमची वेगळी ओळख सांगायची गरज नाही. आठ वेळा विश्वविजेती आणि पद्मभूषण पुरस्कार विजेती मेरी कोमने तिच्या बॉक्सिंग कारकिर्दीतून देशाचे नाव उंचावले आहे. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. परंतु, यावेळी ती तिच्या व्यावसायिक आयुष्यामुळे नव्हे तर तिच्या खासगी आयुष्यातील एका निर्णयामुळे चर्चेत आली आहे. (PC : @mcmary.kom/instagram)

  • 2/9

    मेरी कोम पतीपासून विभक्त होणार?
    मेरी कोम आणि तिचा पती करूंग ओन्खोलर कोम (ऑन्लर) हे आता एकत्र राहत नाहीत. ते २०२२ पासून वेगळे राहत असल्याच्या बातम्या येत आहेत. असे म्हटले जात आहे की दोघांमध्ये बराच काळ मतभेद होते आणि आता हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले आहे. तथापि, मेरी कोम किंवा ऑनलरकडून यावर कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. (PC : @mcmary.kom/instagram)

  • 3/9

    दोघेही वेगळे राहत आहेत.
    हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, मेरी कोम तिच्या मुलांसह फरिदाबादमध्ये राहत आहे तर ऑन्लर त्याच्या कुटुंबासह दिल्लीत वास्तव्यास आहे. २०२२ च्या मणिपूर निवडणुकीनंतर दोघांमधील अंतर वाढू लागले, जे आता घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे, असे मानले जाते. (PC : @mcmary.kom/instagram)

  • 4/9

    कोण आहेत ऑन्लर कोम?
    ऑनलर कोम हे केवळ मेरीचे पती म्हणून प्रसिद्ध नाहीत तर तिच्या यशामागे त्यांचा भक्कम आधार आहे. मेरी कोम स्वतः म्हणते की, “जग म्हणते की प्रत्येक यशस्वी पुरूषामागे एक स्त्री असते, पण माझ्या बाबतीत उलट आहे. माझ्या यशामागे माझे पती आहेत.” (PC : @mcmary.kom/instagram)

  • 5/9

    मेरी कोमला बॉक्सिंगमध्ये करिअर करता यावे म्हणून ऑनdलरने आपली फुटबॉल कारकीर्द सोडून मुलांची आणि कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली होती. (PC : @mcmary.kom/instagram)

  • 6/9

    शिक्षण आणि व्यवसाय
    ओन्लर यांनी शिलाँगच्या जेम्स मेमोरियल स्कूलमधून आपले शालेय शिक्षण घेतले आहे. त्यानंतर, त्यांनी केपीआय मिशन स्कूलमधून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे. ते मेरी कोम रीजनल बॉक्सिंग फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक देखील आहेत. (PC : @mcmary.kom/instagram)

  • 7/9

    २००१ मध्ये जेव्हा मेरी राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी पंजाबला जात होती तेव्हा मेरी आणि ऑन्लरची दिल्लीत भेट झाली. त्यावेळी ऑन्लर दिल्लीतील ईशान्य विद्यार्थी समुदायाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी मेरीला शक्य तितक्या सर्व प्रकारे मदत केली. हळूहळू दोघांमधील मैत्री घट्ट झाली आणि नंतर तिचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी २००५ मध्ये लग्न केले. (PC : @mcmary.kom/instagram)

  • 8/9

    तीन मुलांचे पालक
    मेरी आणि ऑन्लर यांना तीन मुले आहेत, त्यापैकी दोन जुळी मुले आहेत. रेचुंगवार आणि हुपनेयवर अशी त्यांच्या जुळ्या मुलांची नावे आहेत. २०१८ मध्ये त्यांनी एका मुलीला दत्तक घेतले. एक वेळ अशीही आली होती जेव्हा हुपनेयवरला हृदयविकारामुळे शस्त्रक्रिया करावी लागली होती, त्या काळात मेरी आशियाई कपस स्पर्धेची तयारी करत असताना ऑन्लरने त्यांच्या मुलाची काळजी घेतली. (PC : @mcmary.kom/instagram)

  • 9/9

    नात्यात दुरावा
    मेरी आणि ऑन्लरची जोडी नेहमीच ‘परफेक्ट कपल’ म्हणून ओळखली जात होती. मात्र, आता त्यांच्या नात्यात कटुता आल्याच्या बातम्या येत आहेत. वेगळे राहणे, वैचारिक मतभेद आणि काळानुसार वाढत जाणारे अंतर यामुळे आता हे सुंदर नाते वाईट वळणावर येऊन ठेपलं आहे. (PC : @mcmary.kom/instagram)

TOPICS
क्रीडाSportsट्रेंडिंगTrendingमेरी कोमMary Kom

Web Title: Mary kom divorce rumors know about her husband onler jshd import asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.