• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2025 rajasthan royals youngest cricketer vaibhav sooryavanshi cricket career record information photos sdn

Photos: ३५ चेंडूत शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

RR vs GT Vaibhav Suryavanshi Fastest Century: आयपीएल लिलावासाठी निवडलेल्या खेळाडूंच्या यादीत डावखुरा फलंदाज वैभव सूर्यवंशी ४९१व्या क्रमांकावर होता.

Updated: April 29, 2025 10:40 IST
Follow Us
  • Vaibhav Sooryavanshi IPL 2025 Career Records
    1/15

    IPL 2025: युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या (Vaibhav Sooryavanshi) ३८ चेंडूंत १०१ धावा शतकी झंझावातामुळे राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने सोमवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघावर आठ गडी व २५ चेंडू राखून एकतर्फी विजय मिळवला.

  • 2/15

    गुजरातने (Rajasthan Royals vs Gujarat Titans) दिलेल्या २१० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या राजस्थान संघाने आक्रमक सुरुवात केली.

  • 3/15

    सलामीवीर यशस्वी जैस्वाल (४० चेंडूंत ७० धावा) व १४ वर्षीय सूर्यवंशीने गुजरातच्या गोलंदाजांना स्थिरावू दिले नाही.

  • 4/15

    बिहारच्या वैभव सूर्यवंशीने (१४ वर्ष ३२ दिवस) ‘आयपीएल’मध्ये इतिहास रचताना शतक झळकावणारा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला.

  • 5/15

    ‘आयपीएल’मधील हे दुसरे सर्वात जलद शतक ठरले.

  • 6/15

    ‘आयपीएल’च्या सर्वात वेगवान शतकांचा विक्रम वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिास गेलच्या (Chris Gayle) नावे आहे.

  • 7/15

    वैभव सूर्यवंशीने वयाच्या पाचव्या वर्षी क्रिकेट शिकण्यास सुरुवात केली होती.

  • 8/15

    रिपोर्ट्सनुसार, त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून वैभवला नेट प्रॅक्टिस करायला सुरुवात केली.

  • 9/15

    रणजी ट्रॉफीच्या गेल्या मोसमात वैभवला बिहारकडून पदार्पणाची संधी मिळाली.

  • 10/15

    वैभवने अवघे १२ वर्षे आणि २८४ दिवस वय असताना पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला.

  • 11/15

    त्याच वर्षी, वैभव सूर्यवंशीने बिहार क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या रणधीर वर्मा अंडर-१९ वनडे स्पर्धेत त्रिशतकही झळकावले होते.

  • 12/15

    अंडर-१९ स्पर्धेच्या इतिहासातील हे पहिले त्रिशतकही ठरले.

  • 13/15

    आयपीएल लिलावासाठी निवडलेल्या खेळाडूंच्या यादीत डावखुरा फलंदाज वैभव सूर्यवंशी ४९१व्या क्रमांकावर होता.

  • 14/15

    अनकॅप्ड खेळाडूंच्या (UBA9) श्रेणीत त्याचा समावेश होता.

  • 15/15

    त्याने या वर्षी जानेवारी २०२४ मध्ये बिहारसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर सूर्यवंशीने भारत अंडर-१९ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंडर -१९ युवा कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी केली. (सर्व फोटो सौजन्य : वैभव सूर्यवंशी/इन्स्टाग्राम)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेट न्यूजCricket News

Web Title: Ipl 2025 rajasthan royals youngest cricketer vaibhav sooryavanshi cricket career record information photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.