• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. virat kohli top 5 innings in test cricket career bdg

Virat Kohli Test Retirement: किंग कोहलीच्या कसोटीमधील टॉप-५ विराट खेळी पाहिल्यात का? ऑस्ट्रेलिया-इंग्लंडसाठी ठरला होता कर्दनकाळ!

Virat Kohli Retirement Top 5 Test Innings: विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. विराटच्या कसोटी कारकिर्दीतील टॉप-५ खेळी आपण पाहणार आहोत.

May 12, 2025 14:57 IST
Follow Us
  • Virat Kohli Test Retirement
    1/8

    कसोटी क्रिकेटमधील भारताचा उत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या विराट कोहलीने निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला. विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत निवृत्ती घेत असल्याचे म्हटलं.

  • 2/8

    विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधील पाच उत्कृष्ट खेळी पाहूया. या विराट खेळींमुळेच कोहली काय करू शकतो याचा प्रत्यत आला.

  • 3/8

    क्रमांक ५ -कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद भूषवत असलेल्या विराट कोहलीने त्याचा कट्ट्रर प्रतिस्पर्धी संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध २०१८ च्या मालिकेत पर्थच्या हिरव्या खेळपट्टीवर १२३ धावांची उत्कृष्ट खेळी केली होती.

  • 4/8

    क्रमांक ४- विराट कोहलीने २०१६ मध्ये इंग्लंडविरूद्ध मुंबईच्या मैदानावर २३५ धावांची खेळी केली होती. विराटने भारतीय संघाचा डाव सावरत ३४० चेंडूत तब्बल २३५ धावांची खेळी केली. ज्यामुळे भारताला २३१ धावांची आघाडी घेण्यात यश मिळालं आणि परिणामी भारताने हा सामना २३१ धावांनी जिंकला.

  • 5/8

    क्रमांक ३ – २०१४ मध्ये कोहलीने ऑस्ट्रेलियाविरूद्ध अॅडलेड कसोटीतील दोन्ही डावात ११५ आणि १४१ धावांची खेळी करत उत्कृष्ट शतकं झळकावली. कर्णधार म्हणून विराटचा हा पहिलाच कसोटी सामना होता.

  • 6/8

    क्रमांक २ – २०१८ मध्ये विराटने इंग्लंडविरूद्ध बर्मिंगहम कसोटीत दोन्ही डावांमध्ये एकट्याने भारताची खेळी पुढे नेली. एका खेळीत त्याने उत्कृष्ट शतक तर एका खेळीत अर्धशतकी खेळी केली होती.

  • 7/8

    क्रमांक १- युवा विराट कोहलीने त्याच्या पहिल्याच कसोटी २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध अॅडलेड कसोटीत शतक झळकावले होते. या संपूर्ण मालिकेत दिग्गज खेळाडूंसह भरलेल्या भारतीय संघाकडून कसोटी शतक झळकावणारा एकमेव खेळाडू होता.

  • 8/8

    विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये ३० शतकं झळकावली आहेत. विराटची यामधील १४ शतकं भारताच्या विजयी सामन्यांमध्ये आणि ७ शतकं ही भारताच्या पराभूत झालेल्या सामन्यांमध्ये केलेली आहेत. (वरील सर्व फोटो-एक्सप्रेस संग्रहित फोटो)

TOPICS
कसोटी क्रिकेटTest cricketभारत वि. ऑस्ट्रेलियाIndia vs Australiaभारत विरुद्ध इंग्लंडIndia vs Englandमराठी बातम्याMarathi Newsविराट कोहलीVirat Kohli

Web Title: Virat kohli top 5 innings in test cricket career bdg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.