-
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. (Photo: ICC)
-
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने २८२ धावांचा यशस्वी पाठलाग करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. (Photo: ICC)
-
दक्षिण आफ्रिकेसाठी हा विजय अतिशय खास आहे. कारण १९९८ नंतर या संघाला आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आली नव्हती. (Photo: ICC)
-
. त्यामुळे तब्बल २७ वर्षांचा दुष्काळ संपवत दक्षिण आफ्रिकेने आयसीसीची ट्रॉफी उंचावली आहे. (Photo: ICC)
-
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) द्वारे चालवली जाणारी कसोटी क्रिकेटची लीग स्पर्धा आहे, जी २०१९ मध्ये सुरू झाली. कसोटी क्रिकेटसाठी ही प्रीमियर चॅम्पियनशिप आहे. आतापर्यंतचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे अंतिम सामने इंग्लंडमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात आले आहेत. या काळात कोणत्या संघांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकले आहे ते जाणून घेऊयात. (Photo: ICC)
-
न्यूझीलंड
२०१९-२१ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे पहिले विजेतेपद न्यूझीलंड संघाने जिंकले होते. ज्यामध्ये भारताला अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला. (Photo: ICC) -
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियाने २०२१-२३ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. अंतिम सामन्यात भारताला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. (Photo: ICC) -
दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला हरवून पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) जिंकली. तिसरी WTC ट्रॉफी आफ्रिकेला मिळाली. तर यावेळी ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत पराभूत झाला. (Photo: ICC)
WTC Winners List : कोणत्या देशांनी जिंकला आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा खिताब; पाहा संपूर्ण यादी…
आतापर्यंतचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे अंतिम सामने इंग्लंडमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात आले आहेत. या काळात कोणत्या संघांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकले आहे ते जाणून घेऊयात.
Web Title: World test championship winners list south africa australia new zealand wtc trophy spl