Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ind vs eng test rishabh pant century equals sourav ganguly record surpass virat kohli ms dhoni spl

IND vs ENG : ऋषभ पंतने इंग्लंडविरुद्ध ठोकले शतक; धोनी, गावस्कर, कोहलीला मागे टाकत केली सौरव गांगुलीची बरोबरी…

Rishabh Pant Record :इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने १७८ चेंडूत १२ चौकार आणि ६ षटकारांसह १३४ धावा केल्या. या शतकासह तो भारतासाठी कसोटीत सर्वाधिक शतके करणारा यष्टीरक्षक बनला आहे.

June 22, 2025 16:37 IST
Follow Us
  • Rishabh Pant
    1/7

    IND vs ENG: हेडिंग्ले, लीड्स येथे खेळल्या जाणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात, भारतीय संघाचा उपकर्णधार आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतने शानदार फलंदाजीसह शानदार शतक झळकावले. शोएब बशीरच्या चेंडूवर षटकार मारत पंतने आपले शतक पूर्ण केले. (छायाचित्र – बीसीसीआय ट्विटर)

  • 2/7

    पंतचे हे इंग्लंडच्या भूमीवरील तिसरे कसोटी शतक होते. पंतने त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील ७ वे शतक आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमधील चौथे शतक ठोकले. (छायाचित्र – बीसीसीआय ट्विटर)

  • 3/7

    ऋषभ पंतने धोनीचा विक्रम मोडला : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ऋषभ पंतने १४६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या शतकासह, तो भारतासाठी कसोटीत सर्वाधिक शतके करणारा यष्टीरक्षक बनला आहे. त्याने एमएस धोनीचा विक्रम मोडला. धोनीने त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकूण ६ शतके ठोकली आहेत. (फोटो – बीसीसीआय ट्विटर)

  • 4/7

    पंतने कसोटीत यष्टीरक्षक म्हणून ७ शतके झळकावली आहेत, तर ६ कसोटी शतके झळकावणारा एमएस धोनी दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. धोनीने १४४ डावांमध्ये ६ शतके झळकावली आहेत तर पंतने ७५ डावांमध्ये ७ शतके झळकावली आहेत. वृद्धिमान साहाच्या नावावर ३ शतके आहेत. (छायाचित्र – बीसीसीआय ट्विटर)

  • 5/7

    पंतने सौरव गांगुलीची बरोबरी केली : ऋषभ पंत व्यतिरिक्त, सौरव गांगुलीनेही इंग्लंडमध्ये 3 शतके ठोकली आहेत. सुनील गावस्कर, विराट कोहली, विजय मर्चंट, अझरुद्दीन, केएल राहुल आणि रवी शास्त्री यांच्या नावावर प्रत्येकी 2 शतके आहेत. भारताकडून कसोटीत इंग्लंडमध्ये सर्वाधिक शतके राहुल द्रविडने ठोकली आहेत. त्याने ६ शतके ठोकली आहेत. सचिन तेंडुलकर आणि दिलीप वेंगसरकर यांच्या नावावर प्रत्येकी 4 शतके आहेत. (फोटो – बीसीसीआय ट्विटर)

  • 6/7

    इंग्लंडमध्ये कसोटी कारकिर्दीची सुरुवात : ऋषभ पंतने इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. पहिल्याच दौऱ्यात त्याने ओव्हलमध्ये ११४ धावांची खेळी खेळून कसोटी क्रिकेटमध्ये चांगली सुरुवात केली. त्यानंतर २०२२ मध्ये बर्मिंगहॅममध्ये त्याने १४६ धावांची खेळी खेळली. दुसऱ्या डावात त्याने ५७ धावा केल्या. (फोटो – बीसीसीआय ट्विटर)

  • 7/7

    इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पंतने १७८ चेंडूत १२ चौकार आणि ६ षटकारांसह १३४ धावा केल्या. पंत व्यतिरिक्त शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनीही शतके झळकावली. ज्याच्या मदतीने भारताने पहिल्या डावात ४७१ धावा केल्या. (छायाचित्र – बीसीसीआय ट्विटर)

TOPICS
ऋषभ पंतRishabh Pantकसोटी क्रिकेटTest cricketक्रीडाSportsभारत विरुद्ध इंग्लंडIndia vs England

Web Title: Ind vs eng test rishabh pant century equals sourav ganguly record surpass virat kohli ms dhoni spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.