• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. cricketer rishabh pant historic century in both innings after 93 years svk

ऋषभ पंतचा ऐतिहासिक विक्रम: ९३ वर्षात ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज…

ऋषभ पंतचे शतक: ऋषभ पंतने दुसऱ्या डावात १४० चेंडूत १५ चौकार आणि ३ षटकारांसह ११८ धावा केल्या. त्याआधी, पहिल्या डावात त्याने १७८ चेंडूत १२ चौकार आणि ६ षटकारांसह १३४ धावा केल्या.

June 24, 2025 14:00 IST
Follow Us
  •  rishabh pant hundreds
    1/6

    भारताचा उपकर्णधार ऋषभ पंतने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध दोन्ही डावांत शतकं झळकावून इतिहास रचला. इंग्लंडमध्ये कसोटीच्या दोन्ही डावांत शतक करणारा तो तब्बल ९३ वर्षांनंतरचा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. (छायाचित्र – बीसीसीआय ट्विटर)

  • 2/6

    कसोटीच्या दोन्ही डावांत शतक झळकावणारा ऋषभ पंत हा भारताचा सातवा फलंदाज आहे. सुनील गावसकर (३ वेळा) व राहुल द्रविड (२ वेळा) यांनी ही कामगिरी यापूर्वी केली आहे. विजय हजारे हे पहिले भारतीय होते; तर विराट कोहली, अजिंक्य रहाणे व रोहित शर्माही या यादीत सामील आहेत. (छायाचित्र – बीसीसीआय ट्विटर)

  • 3/6

    १९४८ मध्ये विजय हजारे यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन्ही डावात शतक झळकावून इतिहास रचला. त्यानंतर सुनील गावस्कर (३ वेळा), राहुल द्रविड (२ वेळा), आणि विराट कोहली यांनीही ही कामगिरी केली आहे. आता ऋषभ पंतने २०२५ मध्ये इंग्लंडविरुद्ध दोन्ही डावात शतक ठोकून या यादीत आपलं नाव सन्मानाने नोंदवलं आहे. (छायाचित्र – बीसीसीआय ट्विटर)

  • 4/6

    २०१४ साली अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहलीने आपल्या खेळाने सर्वांना भुरळ घातली, दोन्ही डावात शतके झळकावून दमदार कामगिरी केली.
    यानंतर २०१५ मध्ये दिल्लीतील कसोटीत अजिंक्य रहाणेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन्ही डावात शतक ठोकत आपल्या दर्जाची छाप सोडली.
    २०१९ मध्ये विशाखापट्टणमच्या मैदानात रोहित शर्माने देखील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन्ही डावात शतके ठोकत आपल्या फलंदाजी कौशल्याने सर्वांची मनं जिंकली. (छायाचित्र – बीसीसीआय ट्विटर)

  • 5/6

    ऋषभ पंतने लीड्स कसोटीत पहिल्या डावात १३४ आणि दुसऱ्या डावांत पुन्हा शतक ठोकून इंग्लंडमधील चौथे कसोटी शतक पूर्ण केले.
    त्याची इंग्लंडविरुद्धची एकूण कसोटी शतकांची संख्या आता पाच झाली आहे.
    या सामन्यात यशस्वी जयस्वाल व शुभमन गिल यांनी पहिल्या डावात, तर के. एल. राहुलने दुसऱ्या डावात शतक झळकावले. (छायाचित्र – बीसीसीआय ट्विटर)

  • 6/6

    इंग्लंपहिल्या डावात ऋषभ पंतने १७८ चेंडूंत १३४ धावा करीत १२ चौकार व सहा षटकार लगावले.
    दुसऱ्या डावात त्याने शोएब बशीरच्या षटकात आक्रमक खेळी करीत १४० चेंडूंत ११८ धावा फटकावल्या, ज्यात १५ चौकार व तीन षटकारांचा समावेश होता.(छायाचित्र – बीसीसीआय ट्विटर)

TOPICS
क्रिकेटCricket

Web Title: Cricketer rishabh pant historic century in both innings after 93 years svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.