• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. shubman gill net worth know about indias test captains earnings brand endorsements car collection rak

Shubman Gill Net Worth : इंग्लंडच्या गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या ‘प्रिन्स’ शुभमन गिलची संपत्ती किती? ‘या’ माध्यमातून करतो कमाई

Shubman Gill Net Worth : भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिलने इंग्लडविरोधात सलग दोन सामन्यात शतक झळकावले आहे.

July 4, 2025 13:39 IST
Follow Us
  • भारतातील सर्वात प्रतिभावान क्रिकेटपटूंपैकी एक असलेला शुभमन गिल हा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. सध्या सुरू असलेल्या इंग्लंड दौऱ्यावर येण्यापूर्वीच शुबमन गिलकडे भारतीय कसोटी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या कसोटी मालिकेत गिल याची चमकदार कामगिरी सुरू आहे. पहिल्या कसोटीत शतक झळकावल्यानंतर शुभमनने बर्मिंघमच्या मैदानावर दुसऱ्या कसोटीत देखील सातत्य राखत द्विशतकी खेळी केली आहे. (फोटो- शुभमन गिल इंस्टाग्राम)
    1/8

    भारतातील सर्वात प्रतिभावान क्रिकेटपटूंपैकी एक असलेला शुभमन गिल हा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. सध्या सुरू असलेल्या इंग्लंड दौऱ्यावर येण्यापूर्वीच शुबमन गिलकडे भारतीय कसोटी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या कसोटी मालिकेत गिल याची चमकदार कामगिरी सुरू आहे. पहिल्या कसोटीत शतक झळकावल्यानंतर शुभमनने बर्मिंघमच्या मैदानावर दुसऱ्या कसोटीत देखील सातत्य राखत द्विशतकी खेळी केली आहे. (फोटो- शुभमन गिल इंस्टाग्राम)

  • 2/8

    शुभमन गिलने कर्णधार म्हणून सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये दमदार शतकं झळकावली आहेत. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार म्हणून सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये लागोपाठ शतकं झळकवणारा चौथा भारतीय कर्णधार ठरला आहे. यामुळे क्रीडा जगतात सध्या त्याची चर्चा होताना पाहायला मिळत आहे. (फोटो- शुभमन गिल इंस्टाग्राम)

  • 3/8

    आयपीएलमधून कमाई
    इंडियन प्रिमियर लिगच्या २०२५ च्या हंगामाच्या सुरूवातीला गुजरात टायटन्स संघाने शुभमन गिल याला १६.५ कोटी रुपये देऊन रिटेन केले होते. त्यामुळे तो या स्पर्धेतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंपैकी एक ठरला होता. शुभमनला कोलकाता नाईट रायडर्सने १.८ रुपये देऊन २०१८ मध्ये संघात सामील करून घेतले होते. (फोटो- शुभमन गिल इंस्टाग्राम)

  • 4/8

    बीसीसीआयचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट
    भारतीय क्रिकेट संघाचा महत्त्वाचा घटक असलेल्या शुभमन गिलकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे ए ग्रेड काँट्रक्ट मिळाले आहे. या करारानुसार त्याला कसोची, एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट खेळण्यासाठी मॅच फीच्या व्यतिरिक्त वार्षीक ५ कोटींचे रिटेनर मिळते. (फोटो- शुभमन गिल इंस्टाग्राम)

  • 5/8

    ब्रँडच्या जाहिरातीतून कमाई
    गिलची प्रतिमा ही तरुणांसाठी प्रेरणादायी आहे, आणि गेल्या काही दिवसांत त्याच्या प्रसिद्धीमध्ये कमालीची वाढ झाली असल्याने त्याच्याकडे अनेक ब्रँड आकर्षीत झाले आहेत. नाईकी, जिलेट, जेबीएल, सीएट, टाटा कॅपिटल, भारतपे, मायसर्कल, कॅसिओ, Danone, गेम्स24×7 अशा अनेक मोठ्या कंपन्यांनी त्याच्याबरोबर करार केले आहेत. या कंपन्यांच्या जाहिरातीमधून तो जवळपस १ ते २ कोटी वर्षाला कमावतो. (फोटो- शुभमन गिल इंस्टाग्राम)

  • 6/8

    पंजाबमध्ये आलिशान घर
    शुभमन गिल याचे पंजाबच्या फाझिल्का येथे अत्यंत लक्झरी घर आहे, ज्याची अंदाजे किंमत ३.२ कोटींच्या जवळपास असल्याचे सांगितले जाते. हे घर सर्व सोयी-सुविधांनी युक्त आहे. (फोटो- शुभमन गिल इंस्टाग्राम)

  • 7/8

    लक्झरी कार कलेक्शन
    गिलकडे अनेक लक्झरी गाड्या आहेत. त्याच्या कार कलेक्शनमध्ये एक रेंज रोव्ह व्हेलार (अंदाजे किंमत ८९-९० लाख रुपये), मर्सिडीज बेंझ ई३५० (अंदाजे किंमत ८०-९० लाख रुपये) याबरोबरच ऑस्ट्रेलियातील त्याच्या दमदार कामगिरीनंतर आनंद महिंद्रा यांनी भेट म्हणून दिलेली एक महिंद्रा थार देखील त्याच्याकडे आहे. (फोटो- शुभमन गिल इंस्टाग्राम)

  • 8/8

    एकूण संपत्ती किती?
    २५ वर्षीय शुभमन गिलने त्याच्या दमदार आणि सातत्यपूर्ण कामगिरीमुळे क्रिकेट क्षेत्रात स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे. त्याच्या कौशल्याचे सध्या जगभर कौतुक होत आहे. २०२५ पर्यंत त्याची अंदाजे एकूण संपत्ती ३२-५० कोटी रुपये (सुमारे ४-६ दशलक्ष डॉलर्स) इतकी आहे. (फोटो- शुभमन गिल इंस्टाग्राम)

TOPICS
क्रिकेटCricketमराठी बातम्याMarathi Newsशुबमन गिलShubman Gill

Web Title: Shubman gill net worth know about indias test captains earnings brand endorsements car collection rak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.