-
भारतीय संघाचा इंग्लंड दौऱ्यावरील चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाने मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबच्या खेळाडूंची भेट घेतली.
-
बीसीसीआयने या दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.
-
भारतीय संघ मँचेस्टर युनायटेडच्या अकॅडमीमध्ये पोहोचले होता. जिथे दोन्ही संघातील खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी एकमेकांची भेट घेतली.
-
सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे टीम इंडिया आणि मँचेस्टर युनायटेडच्या खेळाडूंनी एकमेकांची जर्सी घातली होती. ज्याच्यावर खेळाडूंची नावही होती.
-
BCCIने शेअर केलेल्या फोटोमध्ये शुबमन गिल, ऋषभ पंत, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह हे खेळाडू फुटबॉलपटूंसह त्यांचे अनुभव शेअर करताना दिसत होते.
-
एका फोटोमध्ये, सिराज युनायटेड डिफेंडर हॅरी मॅग्वायरला गोलंदाजी करताना दिसत होता.
-
दुसऱ्या एका फोटोमध्ये गिल आणि ब्रुनो फर्नांडिस चर्चा करत आहेत.
-
टीम इंडियाचे खेळाडू यादरम्यान फुटबॉल खेळतानाही दिसले. ऋषभ पंतचा गोल करतानाचा फोटोही शेअर करण्यात आला आहे.
-
जसप्रीत बुमराह मेसन माउंट आणि हॅरी मॅग्वायर यांच्याशी गप्पा मारत असतानाचा फोटोही पाहायला मिळाला.
-
भारताचे हेड कोच गौतम गंभीर आणि युनायटेड संघाचे मॅनेजर रूबेन अमोरिम यांचा फोटो तर व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य-BCCI-X)
IND vs ENG: क्रिकेट अन् फुटबॉलचा महासंगम! टीम इंडिया व मँचेस्टर युनायटेडचे संघ एकमेकांच्या जर्सीमध्ये; फोटो पाहिलेत का?
Team India Manchester United: भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटीपूर्वी टीम इंडिया आणि मँचेस्टर युनायटेड या फुटबॉल संघातील खेळाडू एकमेकांना भेटले होते. ज्याचे फोटो बीसीसीआयने शेअर केले आहेत.
Web Title: Indian cricket team meets manchester united football team players wear each other jersey bcci shares photos bdg