-
सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने गेल्या काही वर्षांमध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघातील आपले स्थान पक्के केले आहे.
-
नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिका आणि त्यापूर्वी ऑस्ट्रेलियात यशस्वीने कौतुकास्पद कामगिरी केली होती.
-
दरम्यान, यसस्वीला क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवता यावी यासाठी त्याचा मोठा भाऊ तेजस्वीने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने क्रिकेट सोडले होते. २०१३ च्या अखेरीस तो मुंबई आणि क्रिकेट सोडून दिल्लीला गेलो, जिथे एका नातेवाईकाच्या दुकानात काम केले.
-
या आर्थिक संघर्षांव्यतिरिक्त, तेजस्वीवर मुंबईत क्रिकेट खेळताना वयचोरीचा आरोपही झाला होता.
-
मागे इंडियन एक्सप्रेसशी बोलाताना तेजस्वी म्हणाला होता की, “मी हॅरिस शिल्डमध्ये एक सामना खेळलो आणि सात विकेट्स घेतल्या. मग लोक म्हणू लागले की मी वयचोरी केली आहे. यामुळे . मला दीड वर्ष बेंचवर बसावे लागले होते.”
-
तो पुढे म्हणाला होता की, “यशस्वी खूप चांगली कामगिरी करत होता आणि माझ्यामुळे त्याच्या संधींवर परिणाम होऊ नये असे मला वाटत होते. असो, मुंबई आमच्या दोघांसाठी खूप महाग होती. दिवसातून दोनदा जेवणाची व्यवस्था करणे आमच्या दोघांसाठी कठीण होत चालले होते.”
-
यामुळे वयाच्या १७ व्या वर्षी तेजस्वीने यशस्वीचे भारतीय क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी क्रिकेट सोडले. एकिकडे यशस्वीने वयोगटातील क्रिकेटमध्ये विक्रम मोडण्यास सुरुवात केली होती.
-
दुसरीकडे, मोठा भाऊ दिल्लीतील साउथ एक्सटेंशनमध्ये सजावटीच्या दिवे विकणाऱ्या दुकानात सेल्समन म्हणून काम करू लागला होता. तो यशस्वीला पैसे पाठवत असे. तेजस्वीने त्याच्या दोन्ही मोठ्या बहिणींचे लग्नही करून दिली.
-
तेजस्वी अखेर त्याचे मूळ गाव भदोहीला परतला आहे. आता तो जवळजवळ ३० वर्षांचा झाला आहे, त्यामुळे क्रिकेटचे स्वप्न मागे पडले आहे. (सर्व फोटो सौजन्य: यशस्वी जैस्वाल/इन्स्टाग्राम)
तेजस्वी जायस्वाल: यशस्वीच्या यशामागचा खराखुरा नायक; भावासाठी केला स्वप्नाचा त्याग
Yashasvi Jaiswal: सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने गेल्या काही वर्षांमध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघातील आपले स्थान पक्के केले आहे.
Web Title: Tejasvi jaiswal unsung hero behind yashasvi jaiswals india cricket journey aam