• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. who is cristiano ronaldo s girlfriend georgina rodriguez engagement photo their kids and love life football spl

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या होणार्‍या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का? ८ वर्ष डेट केल्यानंतर घातली लग्नाची मागणी, होकारही मिळाला…

Ronaldo georgina engagement : रोनाल्डो आणि जॉर्जिना गेल्या ८ वर्षांपासून एकत्र राहत आहेत. प्रत्येक जण हे दोघे कधी लग्न करतील याचीच वाट बघत होते.

Updated: August 12, 2025 21:20 IST
Follow Us
  • cristiano ronaldo girlfriend, giorgina rodriguez, cristiano ronaldo engagement
    1/12

    ख्रिस्तियानो लग्न करतोय
    जगप्रसिद्ध स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (cristiano ronaldo) अखेर लग्न करतोय. त्याने नुकतीच त्याची दीर्घकालीन प्रेयसी जॉर्जिना रॉड्रिग्जला (georgina rodriguez) लग्नाची मागणी घातली आहे व तिनेही होकार दिला आहे.

  • 2/12

    प्रेयसीने दिली माहिती
    जॉर्जिनाने इन्स्टाग्रामवर याबद्दलची माहिती दिली आहे. ११ ऑगस्ट २०२५ रोजी रोनाल्डोने तिला लग्नाची मागणी घातल्याची बातमी जॉर्जिनाने दिली आहे. बोटात हिऱ्याची अंगठी घातल्याचा फोटोही तिने शेअर केला आहे.

  • 3/12

    कॅप्शनमध्ये म्हणाली…
    यावेळी जॉर्जिनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हो मी तुझ्यावर प्रेम करते. या आयुष्यातही आणि येणाऱ्या प्रत्येक आयुष्यात.” (Yes I do. In this and in all my lives.) दरम्यान, ही अंगठी किती किंमतीची आहे याचीही चर्चा जोर धरू लागली आहे.

  • 4/12

    रोनाल्डो पाच मुलांचा बाप
    ख्रिस्तियानो रोनाल्डोला जॉर्जिनापासून तीन मुले आहेत. जॉर्जिनाने २०१७ मध्ये मुलगी अलाना मार्टिनाला जन्म दिला. त्यानंतर २०२२ मध्ये तिने मुलगी बेला एस्मेराल्डा आणि मुलगा एंजेलला जन्म दिला, परंतु दुर्दैवाने एंजलचा जन्म झाल्यानंतर लगेच मृत्यू झाला. ख्रिस्तियानोला आणखी तीन मुलं (क्रिस्तियानो ज्युनिअर, माटोओ आणि ईवा) आहेत.

  • 5/12

    दरम्यान, ख्रिस्तियानो ज्युनिअरच्या आईची ओळख नेहमी गुप्त ठेवण्यात आली तर जुळ्या माटोओ आणि ईवा यांचा जन्म सरोगसीद्वारे झाला होता.

  • 6/12

    जॉर्जिनाने बऱ्याच कालावधीपूर्वी एका मासिकाच्या मुलाखतीत सांगितले होते की, तिने या सर्व मुलांना जन्म दिला नाही. परंतु त्यांना ती स्वतःची मुलं मानते आणि ती मुलेही तिला आई मानतात.

  • 7/12

    असे पडले प्रेमात
    रोनाल्डो आणि जॉर्जिना २०१६ मध्ये एकमेकांच्या प्रेमात पडले, त्यांनी डेटिंग सुरू केलं, रोनाल्डोने २०१७ मध्ये तिच्याशी असलेल्या नात्याची कबुली दिली होती. झुरीचमधील फिफा फुटबॉल पुरस्कारांमध्ये ते दोघे पहिल्यांदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले होते जॉर्जिना रोनाल्डोच्या स्पर्धांदरम्यान नेहमी सोबत प्रवास करत असते.

  • 8/12

    जॉर्जिना रोड्रिक्स कोण आहे?
    जॉर्जिना ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे तसेच मॉडेल आणि उद्योजक आहे. ३१ वर्षीय जॉर्जिना अर्जेंटिनामध्ये जन्मली आहे आणि पुढे ती स्पेन मध्ये वाढली.

  • 9/12

    ६८ मिलियन फॉलोअर्स
    जॉर्जिनाला इन्स्टाग्रामवर ६८ मिलियन फॉलोअर्स (Instagram Followers) आहेत आणि जॉर्जिना तिच्या आयुष्यातील गोष्टी चाहत्यांबरोबर नेहमी शेअर करते.

  • 10/12

    रोनाल्डो आणि जॉर्जिना गेल्या ८ वर्षांपासून एकत्र राहत आहेत. प्रत्येक जण हे दोघे कधी लग्न करतील याचीच वाट बघत होते.

  • 11/12

    कधी करणार लग्न?
    दरम्यान आता त्यांनी लग्नाचं ठरवलं आहे पण लग्न नेमकं कधी होणार? कोणत्या वर्षी होणार? याचं उत्तर येणारा काळचं देणार आहे.

  • 12/12

    (सर्व फोटो साभार- जॉर्जिना रॉड्रिग्ज, ख्रिस्तियानो रोनाल्डो इन्स्टाग्राम) हेही पाहा- स्मरणशक्ती होईल तीक्ष्ण, अल्झायमरचं नो टेन्शन; मेंदूचं आरोग्य ठणठणीत ठेवणाऱ्या १० पदार्थांचा आहारात करा समावेश

TOPICS
क्रीडाSportsख्रिस्तियानो रोनाल्डोCristiano RonaldoफुटबॉलFootball

Web Title: Who is cristiano ronaldo s girlfriend georgina rodriguez engagement photo their kids and love life football spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.