Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. sahara to dream 11 sponsers of indian cricket team bcci contract information in marathi spl

सहारा ते ड्रीम ११; भारतीय क्रिकेट संघाची जर्सी दुर्दैवी आहे का? प्रायोजकांना आल्या आर्थिक अडचणी, स्पॉन्सरशिपचा इतिहास काय?

ड्रीम ११ पूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे सहारा, स्टार इंडिया, ओप्पो आणि बायजूज हे प्रायोजक राहिले आहेत. त्यांची बीसीसीआयबरोबरची भागीदारी का संपूष्टात आली? याबद्दल जाणून घेऊयात…

Updated: August 26, 2025 12:26 IST
Follow Us
  • Mohammed Siraj performance, Jasprit Bumrah importance, Indian cricket fast bowlers, RP Singh workload management, cricket injury prevention, England series cricket, cricket bowling workload,
    1/9

    अलिकडेच पैसे लावले जाणाऱ्या ऑनलाइन जुगारावर बंदी आणणारं विधेयक संसदेने मंजुर केलं. ‘ड्रीम ११’ हे भारतीय संघाचे अधिकृत प्रायोजक होते. पण, या विधेयकानंतर ड्रिम ११ ने भारतीय क्रिकेट संघाचं प्रायोजकत्व सोडलं आहे. त्यामुळं आशिया कपपूर्वी बीसीसीआय आता नवा प्रायोजकाच्या शोधात आहे, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी दिली आहे. (Photo: AP Photo)

  • 2/9

    दरम्यान, ड्रीम ११ पूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे सहारा, स्टार इंडिया, ओप्पो आणि बायजूज हे प्रायोजक राहिले आहेत. त्यांची बीसीसीआयबरोबरची भागीदारी का संपूष्टात आली? याबद्दल जाणून घेऊयात… (Photo: Social Media)

  • 3/9

    सहारा इंडिया (२००१ ते २०१३)
    सहारा इंडियाची भागीदारी भारतीय संघाबरोबर सर्वाधिक काळ टिकली, जी एकूण ११ वर्षांपर्यंत चालली. २०१० साली सहाराच्या बीसीसीआयबरोबरच्या कराराचं नुतनीकरण करण्यात आलं व त्यांनी प्रत्येक सामन्यासाठी ३.३४ कोटी रूपये दिले. पण, दीर्घकाळ टिकलेली ही भागीदारी अखेर आर्थिक तणावामुळं अचानकपणे संपूष्टात आली. (Photo: Social Media)

  • 4/9

    स्टार इंडिया (२०१४-२०१७):
    २०१४ मध्ये स्टार इंडियाबरोबर ४ वर्षांचा करार झाला. त्यांनी प्रत्येक द्विपक्षीय सामन्यासाठी सुमारे १.९२ कोटी आणि आयसीसी टूर्नामेंट सामन्यासाठी ६१ लाख इतकी बोली लावली होती. स्टार हे देशातले मोठे नेटवर्क असूनही २०१७ मध्ये ते या करारातून बाहेर पडले व त्यांनी संघाचे प्रायोजक बनण्याऐवजी थेट प्रसारणाच्या हक्कांकडे मोर्चा वळवला. (Photo: Social Media)

  • 5/9

    ओप्पो मोबाईल्स इंडिया (२०१७-२०१९):
    त्यानंतर ओप्पोने १,०७९ कोटी रुपयांचा पाच वर्षांचा मोठा करार केला – बीसीसीआयने निश्चित केलेल्या मूळ किमतीच्या दुप्पट त्यांनी किमंत मोजली. (Photo: Social Media)

  • 6/9

    या लोकप्रिय ब्रँडने प्रत्येक द्विपक्षीय सामन्यासाठी ४.६१ कोटी आणि आयसीसी सामन्यासाठी १.५१ कोटी देण्याचे मान्य केले. दरम्यानच्या काळात कंपनीला आर्थिक आव्हानं आली व ओप्पोने मध्येच प्रायोजकत्व सोडून दिले. (Photo: Indian Express)

  • 7/9

    बायजूज (२०१९-२०२३):
    बायजूजने २०१९ मध्ये ५ टक्के अतिरिक्त पुनर्नियुक्ती शुल्क भरले व ओप्पोकडून प्रायोजकत्वाचे हक्क स्वीकारले. (Photo: Social Media)

  • 8/9

    या टेक कंपनीने २०२३ पर्यंत हा करार कायम ठेवला परंतु अंतर्गत आर्थिक अडचणी आणि ऑपरेशनल समस्यांना तोंड देत असल्याने त्यांनी माघार घेतली. (File Photo)

  • 9/9

    ड्रीम११ (२०२३-२०२५):
    ड्रीम ११ ने ३५८ कोटी रुपयांसह बीसीसीआयबरोबर ३ वर्षांचा करार केला. परंतु तोही आता संपुष्टात आला. ड्रीम ११ च्या जाण्यामुळे टीम इंडियाबाबत दीर्घकालीन प्रायोजकत्व टिकवून ठेवू न शकणाऱ्या प्रायोजकांच्या वाढत्या यादीत भर पडली आहे. (Photo: Social Media) हेही पाहा- Asia Cup: माही भाई नाही, आशिया कपमध्ये कर्णधार म्हणून ‘हा’ दिग्गज नंबर १; सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप ५ कर्णधार

TOPICS
क्रिकेटCricketक्रीडाSports

Web Title: Sahara to dream 11 sponsers of indian cricket team bcci contract information in marathi spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.