Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. abhishek sharma rinku singh jitesh sharma 7 indian cricketers first time play asia cup spl

Asia Cup 2025: अभिषेक शर्मा ते रिंकू सिंग, आशिया कपमध्ये पहिल्यांदाच खेळणार ‘हे’ ७ भारतीय क्रिकेटपटू

Aisa Cup 2025, Indian squad asia cup : भारतीय संघातील ७ खेळाडू पहिल्यांदाच आशिया कपमध्ये खेळताना दिसतील, कोण आहेत हे खेळाडू? चला जाणून घेऊयात…

Updated: September 9, 2025 11:47 IST
Follow Us
  • 7 Indian cricketers first time play asia cup
    1/7

    यावेळी आशिया कप टी-२० स्वरूपात खेळला जाणार आहे. भारताचा संघ १० सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
    अभिषेक शर्मा
    भारताचा फलंदाज अभिषेक शर्माने संघासाठी १७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. अभिषेकने २०१८ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने त्याच्या छोट्या कारकिर्दीत या फॉरमॅटमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे. अभिषेकने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५३५ धावा केल्या आहेत. २ शतके आणि २ अर्धशतके झळकावणाऱ्या अभिषेकचा या फॉरमॅटमध्ये स्ट्राइक रेट १९३.८४ आहे. अभिषेक पहिल्यांदाच आशिया कपमध्ये खेळताना दिसणार आहे. (Photo: Abhishek Sharma/Instagram)

  • 2/7

    रिंकू सिंग
    रिंकूने यूपी टी-२० लीगमध्ये शतकीय खेळी केली आहे. तो पहिल्यांदाच आशिया कपमध्ये खेळणार आहे. आशिया कपमध्ये चमकदार कामगिरी करेल अशी आशा आहे. (Photo: PTI)

  • 3/7

    हर्षित राणा
    वेगवान गोलंदाज हर्षित राणा त्याच्या पहिल्या आशिया कपमध्ये भारतीय आक्रमणाचा महत्त्वाचा भाग आहे. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग सारख्या गोलंदाजांबरोबर त्याला प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल. हर्षितची अलिकडची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याने भारतासाठी एक टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. ज्यामध्ये त्याने ३ विकेट घेतल्या आहेत. (Photo: BCCI/X)

  • 4/7

    संजू सॅमसन
    संजू सॅमसनसाठीही आशिया कप एक मोठी संधी आहे. त्याच्या पहिल्या आशिया कपमध्ये चांगली कामगिरी करून तो संघात आपले स्थान कायमचे पक्के करू शकतो. संजूने ४२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३ शतके आणि दोन अर्धशतकांसह ८६१ धावा केल्या आहेत. (Photo: Sanju Samson/Instagram)

  • 5/7

    शिवम दुबे
    शिवम दुबे पहिल्यांदाच आशिया कपमध्ये खेळणार आहे. या अष्टपैलू खेळाडूचे आयपीएल २०२५ मधले प्रदर्शन चांगले राहिले नाही. पण तो त्याच्या पहिल्याच आशिया कपमध्ये मधल्या फळीत खेळ बदलू शकतो. शिवम दुबेने आतापर्यंत भारतासाठी ३५ टी-२० सामने खेळले आहेत ज्यामध्ये त्याने ५३१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ४ अर्धशतके झळकावली आहेत. (Photo: Reuters)

  • 6/7

    वरुण चक्रवर्ती
    वरुण चक्रवर्तीला एक उत्तम फिरकी गोलंदाज म्हटले जाते. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली या त्याने त्याची कारकीर्द पुन्हा एकदा रुळावर आणली आहे. जरी त्याने भारतासाठी एक विश्वचषक खेळला असला तरी तो पहिल्यांदाच आशिया कपमध्ये खेळताना दिसणार आहे. वरुणने भारतासाठी १८ टी-२० सामन्यांमध्ये ३३ विकेट्स घेतल्या आहेत. (Photo: BCCI/X)

  • 7/7

    जितेश शर्मा
    विकेटकीपर फलंदाज जितेश शर्माने भारतासाठी फक्त ९ टी-२० सामने खेळले आहेत. जितेश पहिल्यांदाच आशिया कपमध्ये खेळताना दिसणार आहे. पण शुभमन गिलच्या आगमनाने संजू सॅमसनला संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी झाली आहे आणि अशा परिस्थितीत तो पहिल्या पसंतीचा विकेटकीपर असू शकतो. (AP Photo) हेही पाहा- Anaya Bangar: माझे शरीर, माझी निवड! आर्यन ते अनाया होण्याचा संघर्षमय प्रवास; ८व्या वर्षी काय घडलं होतं?

TOPICS
आशिया चषक २०२५Asia Cup 2025क्रिकेटCricketक्रीडाSports

Web Title: Abhishek sharma rinku singh jitesh sharma 7 indian cricketers first time play asia cup spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.