-   सर्वात जलद १०० षटकार 
 टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० षटकार मारण्याचा भारतीय विक्रम सूर्यकुमार यादवच्या नावावर आहे. त्याने ४९ डावांमध्ये हा आकडा गाठला. (Photo: Social Media)
-  तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या पुढे वेस्ट इंडिजचा एविन लुईस आहे, ज्याने ४२ डावांमध्ये १०० षटकार मारले. (Photo: Social Media) 
-  एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार 
 सूर्या हा एका कॅलेंडर वर्षात टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय खेळाडू आहे. त्याने २०२२ मध्ये ६८ षटकार मारले. (Photo: Social Media)
-  सूर्याने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत ८४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि त्याने १४७ षटकार मारले आहेत. तो टी-२० मध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा खेळाडू आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस) 
-  हा पराक्रम करणारा एकमेव भारतीय 
 आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये एका कॅलेंडर वर्षात एक हजार धावांचा टप्पा गाठणारा सूर्यकुमार हा एकमेव भारतीय आहे. त्याने २०२२ मध्ये ३१ सामन्यांमध्ये ११६४ धावा केल्या. (Photo: Social Media)
-  तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या, सर्वात लहान फॉरमॅटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानच्या नावावर आहे. त्याने २०२१ मध्ये १३२६ धावा केल्या. (संग्रहित छायाचित्र) 
-  कोहलीची बरोबरी 
 सूर्या हा आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात जलद दोन हजार धावा करणारा संयुक्त भारतीय खेळाडू आहे. त्याने या बाबतीत विराट कोहलीची बरोबरी केली. (Photo: Social Media)
-  सूर्या आणि कोहली यांनी ५६-५६ डावांमध्ये दोन हजार धावा केल्या. सूर्याने ८४ सामन्यांमध्ये २६०५ धावा केल्या आहेत. कोहलीने कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. (Photo: Social Media) 
-  सूर्याने टी२० मध्ये चार शतके झळकावली 
 सूर्यकुमार यादव हा आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा संयुक्त दुसरा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत चार शतके ठोकली आहेत. इंग्लंडच्या फिल साल्टनेही चार शतके ठोकली आहेत. दोघांच्याही पुढे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आहेत. मॅक्सवेल आणि रोहितने प्रत्येकी पाच शतके ठोकली आहेत. रोहितने कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. (Photo: Social Media)
Suryakumar Yadav Birthday: सूर्याचे ५ जबरदस्त विक्रम, ‘अशी’ कामगिरी करणारा एकमेव भारतीय खेळाडू
भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार आणि स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचा आज ३५ वा वाढदिवस आहे. त्याचा जन्म १४ सप्टेंबर १९९० रोजी मुंबईत झाला. २०२१ मध्ये भारतासाठी पदार्पण केले. सूर्याने एकदिवसीय सामन्यांच्या तुलनेत टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चांगली छाप पाडली आहे. त्याच्या वाढदिवशी सूर्याचे ५ आश्चर्यकारक रेकॉर्ड जाणून घेऊ.
Web Title: Suryakumar yadav birthday know his 5 records only indian achieve this numbers in runs calendar year spl