-
३१ वर्षीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. हार्दिक पंड्याचा नताशा स्टॅन्कोविचशी घटस्फोट आणि गर्लफ्रेंड जास्मिन वालियापासून वेगळे झाल्याच्या बातम्यांनंतर, आता असा अंदाज लावला जात आहे की, तो २४ वर्षीय मॉडेल आणि अभिनेत्री माहिका शर्माला डेट करत आहे. चाहत्यांना त्याच्या नवीन प्रेयसीबद्दल उत्सुकता आहे, पण माहिका शर्मा कोण आहे?
-
महिका ही दिल्लीची रहिवासी आहे आणि तिच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, तिने दिल्लीतील नेव्ही चिल्ड्रन्स स्कूलमध्ये शिक्षण घेतले. नंतर तिने कॉलेजमध्ये अर्थशास्त्र आणि वित्त विषयांत पदवी घेतली. शैक्षणिकदृष्ट्या हुशार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, माहिकाने तिच्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत १० सीजीपीए गुण मिळवल्याचे म्हटले जाते. विद्यार्थी असताना, तिने तेल आणि वायू धोरणात वित्त, शिक्षण आणि व्यवस्थापन सल्लागार यासह विविध क्षेत्रात इंटर्नशिप केली आहे.
-
शिक्षण पूर्ण केल्यानंतर, माहिकाने सर्जनशील क्षेत्राकडे लक्ष वळवले आणि पूर्णवेळ अभिनय आणि मॉडेलिंग व्यवसाय सुरू केला. ती भारतीय रॅपर रागाच्या एका म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली आणि विविध प्रकल्पांमध्ये छोट्या भूमिका केल्या, ज्यात ऑस्कर विजेता डॉक्युमेंटरी फिल्ममेकर ऑर्लॅंडो वॉन आइन्सीडेलचा चित्रपट “इनटू द डस्क” आणि विवेक ओबेरॉय अभिनीत ओमंग कुमारचा चित्रपट “नरेंद्र मोदी” (२०१९) यांचा समावेश आहे.
-
अभिनयासोबतच, माहिकाने फॅशन क्षेत्रातही एक प्रभावी कारकीर्द घडवली आहे. तिने अनिता डोंगरे, रितू कुमार, तरुण ताहिलियानी, मनीष मल्होत्रा आणि अमित अग्रवाल यांसारख्या आघाडीच्या डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केला आहे. तिच्या कामामुळे तिला २०२४ च्या इंडियन फॅशन अवॉर्ड्समध्ये मॉडेल ऑफ द इयर (न्यू एज) पुरस्कार मिळाला होता.
-
एक रेडिट पोस्ट व्हायरल झाल्यानंतर हार्दिक पंड्यासोबतच्या तिच्या नात्याबद्दलच्या चर्चांना सुरुवात झाली. चाहत्यांनी महिकाच्या एका सेल्फीमध्ये मागच्या बाजूला हार्दिकला पाहिले. दोघेही इंस्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करतात आणि महिकाच्या एका पोस्टमध्ये ती तिची ३३ क्रमांकाचा जर्सी दाखवताना दिसते आहे. पण, हार्दिक किंवा महिका दोघांनीही अद्याप या डेटिंगच्या अफवांवर प्रतिक्रिया दिलेली नाही.
-
हार्दिकने २०२० मध्ये नृत्यांगना आणि अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविकशी लग्न केले आणि २०२३ मध्ये या जोडप्याला मुलगा धाला. पण, त्यांचे नाते २०२४ मध्ये संपुष्टात आले.
हार्दिक पंड्याची २४ वर्षीय कथित प्रेयसी माहिका शर्मा कोण आहे?
Who Is Mahika Sharma | हार्दिक पांड्याचा नताशा स्टॅन्कोविकशी घटस्फोट झाल्यानंतर, आता असा अंदाज लावला जात आहे की तो २४ वर्षीय मॉडेल आणि अभिनेत्री महिका शर्माला डेट करत आहे. चाहत्यांना त्याच्या नवीन प्रेयसीबद्दल उत्सुकता आहे, पण येथे जाणून घ्या कोण आहे महिका शर्मा?
Web Title: Hardik pandya new girlfriend dating rumored relationship with mahieka sharma aam