-
India Wins Asia Cup against pakistan: आशिया चषकाच्या रोमहर्षक अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानला भारताने पुन्हा एकदा पराभूत केलंय. या स्पर्धेत पाकिस्तानला भारताविरुद्ध एकही विजय मिळवता आला नाही. (एपी फोटो)
-
एवढच नाही तर भारताने या संपूर्ण स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. भारताने ९व्यांदा आशिया चषकावर नाव कोरलंय. (एपी फोटो)
-
भारताच्या या विजयानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानच्या पराभाववर अनेक धमाल मीम्स व्हायरल होत आहेत. पाहुयात काही भन्नाट व्हारल मीम्स… (फोटो – सोशल मीडिया)
-
हे एक धमाल मीम व्हायरल होत आहे. ‘We survived powerplay without a wicket…’ सोशल मीडियावर या मीमला असं कॅप्शन दिलं आहे. (फोटो – सोशल मीडिया)
-
या पाकिस्तानी चाहत्याने त्यांचा ध्वज चुकीच्या पद्धतीने धरला आहे, त्यामुळे तो मीमचा विषय बनलाय. ‘Pakistanis ko apne flag ka b ni pata’ असं कॅप्शन दिलेला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (फोटो – सोशल मीडिया)
-
आम्हाला भारताच्या खेळाडूंच्या कौशल्यावर आणि खिलाडूवृत्तीवर संपूर्णपणे विश्वास आहे, पण थोडीशी मदत करा बाबा, आम्ही कोणाला सांगणार नाही, अशा अर्थाने हा मीम भारतीय चाहत्याने शेअर केला आहे. त्याला ‘Finally India got its first wicket’ असं, कॅप्शन दिलं आहे. दरम्यान कालच्या सामन्यात भारताला पहिलं विकेट १० ओव्हरनंतर मिळालं होतं. (फोटो – सोशल मीडिया)
-
कालच्या सामन्यात संजू सॅमसनचा खूप सोपा झेल पाकिस्तानी खेळाडूने सोडला होता. ज्याचा फायदा भारताला सामना जिंकण्यासाठी झाला. त्यामुळे हे मीम सर्वकाही सांगून जात आहे. (फोटो – सोशल मीडिया)
-
पाकिस्तानी गोलंदाज हरिस रौफने या सीरीजमध्ये भारताविरुद्ध खेळताना ऑपरेशन सिंदूरवरुन भारताला डिवचलं होतं. त्याने मैदानात विमान पडल्याची कृती केली होती. त्यावरुन भारताच्या जसप्रीत बुमराहनेही त्याला तोंडावर जशास तस उत्तर दिलं आहे. त्यामुळे हे मीम तुफान व्हायरल आहे. (फोटो – सोशल मीडिया)
-
(फोटो – सोशल मीडिया) हेही पाहा- ‘मैदान कोणतेही असो, भारत जिंकणारच’; पाकविरुद्ध भारताच्या दणदणीत विजयावर नेते- अभिनेते म्हणाले….
Photos: भारताकडून फायनलमध्येही पराभूत झालेल्या पाकिस्तानवर नेटकऱ्यांचे भन्नाट मीम्स, पोट धरून हसाल…
IND vs PAK Memes: भारताच्या आशियाकपमधील विजयानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानच्या पराभाववर अनेक धमाल मीम्स व्हायरल होत आहेत. पाहुयात काही भन्नाट व्हारल मीम्स…
Web Title: Asia cup 2025 memes flood on social media as india wins against pakistan in fianl spl