-
भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. ( फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या सामन्यात फलंदाजी करताना यशस्वी जैस्वालने १७५ धावांची दमदार खेळी केली. तर शुबमन गिलने देखील दमदार शतकी खेळी केली. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
हे गिलचे कसोटी क्रिकेटमधील १० वे शतक ठरले आहे. यासह शतकासह त्याने अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत गिल अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याने १० शतकं झळकावली आहे.या विक्रमात त्याने ९ शतकं झळकावणाऱ्या रोहित शर्माला मागे टाकलं आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
कसोटी क्रिकेटमध्ये एकाच वर्षात सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या कर्णधारांच्या यादीत त्याने विराट कोहलीची बरोबरी केली आहे. विराटने २०१७ आणि २०१८ मध्ये ५-५ शतकं झळकावली होती. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये कर्णधा म्हणून सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने रोहित शर्माला मागे टाकलं आहे. रोहितने ४ शतकं झळकावली आहेत.( फोटो- इंडियन एक्सप्रेस)
Shubman Gill: रन मशीन गिलचा धमाका! एका डावात मोडले ३ मोठे रेकॉर्ड; विराट-रोहितला टाकलं मागे
Shubman Gill Records: भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटीत शुबमन गिलने मोठे विक्रम मोडून काढले आहेत.
Web Title: Ind vs wi 2nd test shubman gill breaks these big record by scoring century amd