-

IND-W vs SA-W World Cup 2025 Final Match Updates: भारताच्या महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून पहिला-वहिला विश्वचषक जिंकण्याचा ऐतिहासिक विक्रम केला आहे.
-
भारताने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी हरवले. ५० षटकांत ७ गडी गमावून २९८ धावा केल्या.
-
शफाली वर्माने ८७ धावांची (७८ चेंडू) दमदार खेळी केली. तिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
-
दीप्ती शर्माने ५८ धावा केल्या आणि गोलंदाजीत ५ बळी घेत दक्षिण आफ्रिकेचा डाव गुंडाळला. तिला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.
-
नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियम येथे भारत व दक्षिण आफ्रिका हा सामना पार पडला.
-
जेमिमा रॉड्रीग्जने (Jemimah Rodrigues) सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोची सध्या चर्चा सुरू आहे.
-
या फोटोमध्ये जेमिमा रॉड्रीग्ज, स्मृती मानधना (Smriti Mandhana), राधा यादव (Radha Yadav), अरुंधती रेड्डीने (Arundhati Reddy) ट्रॉफीबरोबर पोज देत आहेत, या फोटोला ‘Are we still dreaming?’ असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जेमिमा रॉड्रीग्ज/इन्स्टाग्राम)
Photos: जेमिमा रॉड्रीग्जने शेअर केलेल्या ट्रॉफीबरोबरच्या फोटोची चर्चा; कॅप्शन देत म्हणाली…
INDIA won Women’s World Cup 2025 by 52 Runs against South Africa: संपूर्ण देशभरात या विजयाचा मोठा जल्लोष साजरा होत आहे!
Web Title: India won womens world cup 2025 against south africa by 52 runs jemimah rodrigues smriti mandhana photos sdn