• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. why motorcycle and scooter headlights are always on making roads safer for indias popular two wheelers pdb

नव्या बाईक अन् स्कूटरचे हेडलाइट्स दिवसाही का सुरूच असतात? जाणून घ्या यामागील ‘हे’ खरं कारण

Why Bike Headlight Always On: नव्या बाईक अन् स्कूटरचे हेडलाइट्स दिवसाही का सुरूच असतात माहितेय का? ‘हे’ आहे यामागील खरं कारण

July 5, 2023 13:05 IST
Follow Us
  • भारत जगातील सर्वात मोठ्या दुचाकी बाजारपेठांपैकी एक आहे. मोठी लोकसंख्या दुचाकीने प्रवास करते. 
    1/12

    भारत जगातील सर्वात मोठ्या दुचाकी बाजारपेठांपैकी एक आहे. मोठी लोकसंख्या दुचाकीने प्रवास करते. 

  • 2/12

    आपल्या देशात बहुतेक लोकांकडे वैयक्तिक वाहन म्हणून दुचाकी आहेत. देशात बाईकची मागणी वाढली असून याच्या विक्रीतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

  • 3/12

    तुम्ही रस्त्यावरून जात असताना समोरून येणाऱ्या बाईकचे हेडलाइट्स तुम्हाला दिवसाही सुरू दिसले असेलच.

  • 4/12

    पण बाईकचे हेडलाइट्स रात्री सोबतच दिवसाही का सुरु असतात, याचा कधी तुम्ही विचार केलाय का, चला तर आज आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया…

  • 5/12

    शोरूममध्ये नव्याने दाखल झालेल्या दुचाकी, चारचाकी गाड्यांना ऑटोमॅटिक हेडलाइट सिस्टीम (एएमओ) ही नवीन यंत्रणा आली आहे. यामुळे गाडी चालू केली, की गाड्यांच्या हेडलाइट आपोआपच सुरू राहणार आहेत.

  • 6/12

    १ एप्रिलपासून प्रदूषणमुक्तीसाठी बीएस-४ या नवीन इंजिनप्रणालीचा सर्वच वाहनांमध्ये समावेश करण्यात आलं आहे. आता बाईक आणि स्कूटरची हेडलाईट नेहमी चालू असते आणि हँडलवरील स्विच बंद करण्याचा स्वीचही काढून टाकण्यात आला आहे.

  • 7/12

    देशभरात आणि विशेषतः शहरांमध्ये अपघातांचे प्रमाण वाढते आहे. अपघाताची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्रीय परिवहन मंत्रालयाने ‘ऑटोमॅटिक हेडलाइट ऑन’ (AHO) वैशिष्ट्य सुरू करण्याची शिफारस केली होती. 

  • 8/12

     नेहमी चालू असलेल्या हेडलाइटचा मुख्य उद्देश रस्त्यांवरील दुचाकींची दृश्यमानता वाढवणे हा होता. भारतातही टू व्हीलरमध्ये ऑटोमॅटिक हेडलाइट ऑन फीचर आणण्यामागचे हे मुख्य कारण आहे.

  • 9/12

    वास्तविक, रस्त्यावर लहान वाहनांची दृश्यमानता कमी आहे. अशा स्थितीत दूरवरून वाहन येत असेल तर त्याचा पत्ता लागत नाही. त्याचबरोबर खराब हवामान किंवा रस्त्यावर धुके असल्याने छोटी वाहने अजिबात दिसत नाहीत.

  • 10/12

    अशा स्थितीत वाहनांची धडक बसण्याची शक्यता वाढते. मात्र, जर बाईकची हेडलाईट नेहमी चालू असेल तर तिची दृश्यमानता कायम राहते आणि ती दूरवरूनही दिसू शकते.

  • 11/12

    AHO सह बाईकवर सतत हेडलाइट्स चालू ठेवल्याने बॅटरीवर परिणाम होत नाही, असे तज्ञांचे मत आहे. आजकालच्या नवीन बाइक्समध्ये अॅडव्हान्स बॅटरी टेक्नॉलॉजी आणि पर्याय वापरले जात आहेत, त्यामुळे लोड वाढल्यावरही बॅटरीवर परिणाम होत नाही.

  • 12/12

    दुसरीकडे, AHO प्रणाली बाईकच्या मायलेजवर परिणाम करत नाही. आता अनेक बाइक्स LED DRL सह येऊ लागल्या आहेत ज्यात नेहमी चालू असलेल्या हेडलाइटच्या जागी नेहमी ऑन LED लाईट वापरण्यात आली आहे. ते हेडलाइट्सपेक्षा कमी उर्जा वापरतात आणि दुरून पाहता येतात. (फोटो सौजन्य-Pexels)

TOPICS
इलेक्ट्रिक स्कूटरElectric Scooterऑटो न्यूजAuto Newsट्रेंडिंग न्यूजTrending NewsदुचाकीTwo Wheeler

Web Title: Why motorcycle and scooter headlights are always on making roads safer for indias popular two wheelers pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.