• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. mg hector internet suv is a big hit in indian market crossed 50000 bookings know price specifications and all other details sas

तेव्हा गाढव बांधून काढली होती धिंड, आता SUV ने 8 महिन्यांमध्येच केला धमाका

लाँचिंगच्या आठ महिन्यांमध्येच केला मोठा धमाका…

February 20, 2020 15:17 IST
Follow Us
    • MG Motor India ने गेल्या वर्षी जून महिन्यात भारतात आपली पहिली SUV कार MG Hector लाँच केली. लाँच झाल्यापासूनच या Internet SUV गाडीला भारतात शानदार प्रतिसाद मिळतोय. 2019 सप्टेंबर महिन्यामध्ये तर प्रमाणापेक्षा अधिक प्रतिसाद मिळाल्याने कंपनीने बुकिंग घेणे थांबवले होते. आकर्षक किंमतीमुळे भारतात या कारकडून टाटा हॅरियर, ह्युंडई क्रेटा, निसान किक्स, जीप कंपास यांसारख्या गांड्यांसाठी मोठं आव्हान निर्माण झालंय. (सर्व छायाचित्र सौजन्य – mgmotor.co.in, ट्विटर, ,@Renuks आणि @adiljal )
    • 1/25

      अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसादामुळे सप्टेंबरमध्ये बुकिंग थांबवल्यानंतर कंपनीने कंपनीने गुजरातच्या प्लांटमध्ये अतिरिक्त उत्पादन घेण्यास सुरूवात केली. नंतर कंपनीने गाडीच्या किंमतीतही वाढ केली आणि Hector च्या बुकिंगला पुन्हा एकदा सुरुवात झाली. पण…

    • 2/25

      पण, त्यानंतर डिसेंबर २०१९ मध्ये एका ग्राहकाने गाढव बांधून हेक्टरची धिंड काढल्याचा व्हिडिओ समोर आला होता.

    • राजस्थानच्या उदयपूर येथील विशाल पंचोली नावाच्या एका नाराज ग्राहकाने आपल्या कारच्या चारही बाजूंना ‘डॉंकी व्हेइकल’ अर्थात ‘गाढव गाडी’ असे बॅनर लावले आणि कारपुढे गाढव बांधून त्याने या कारची धिंड काढली होती.
    • 3/25

      कारच्या ‘क्लच’मध्ये पंचोली यांना काही समस्या जाणवत होती. त्यानंतर कंपनीने यावर स्पष्टीकरण दिले होते. “ग्राहकाला जाणवणारी समस्या सोडवण्यासाठी योग्य ती सर्व पाऊलं उचलण्यात आली होती, त्याच्या समस्येचं निराकरण करण्याचा सर्वोतपरी प्रयत्न सुरू होता. पण, कंपनीकडून अयोग्य पद्धतीने फायदा उचलण्याचा ग्राहकाचा प्रयत्न आहे. याप्रकारामुळे आमच्यासारख्या प्रतिष्ठीत कंपनीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होतोय”, असं म्हणत आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून त्या ग्राहकाविरोधात योग्य ती कारवाई करणार आहोत असा इशारा कंपनीकडून एका फेसबुक ग्रुपवर देण्यात आला होता. पण, त्यावेळी गाढवावरुन धिंड काढल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता.

    • मात्र, आता कंपनीने मोठा विक्रम रचलाय. लाँच झाल्यापासून अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीतच कंपनीने २० हजार Hector ची विक्री केलीये. तर , आतापर्यंत ५० हजारांपेक्षा जास्त जणांनी गाडीसाठी बुकिंग केली आहे. कंपनीने याबाबत…
    • 4/25

      कंपनीने याबाबत गुरूवारी घोषणा केली. लाँच झाल्यापासूनच ही कार प्रचंड लोकप्रिय ठरतेय. लाँचिंगनंतर अवघ्या २३ दिवसांमध्ये या कारसाठी १० हजार जणांनी बुकिंग केले होते. तर, बुकिंग सुरू झाल्यानंतर केवळ ४५ दिवसांमध्ये कंपनीला २१ हजारांहून अधिक ऑर्डर मिळाल्या होत्या.

    • 5/25

      "भारतीय बाजारातील आमची शानदार कामगिरी सुरूच आहे. येत्या काही दिवसांमध्ये नवीन आउटलेट उभारण्यावर आमचा भर असेल. हेक्टर ब्रँड भारतात अजून लोकप्रिय करण्याचं आमचं लक्ष्य असेल. तसेच, लवकरच भारतात Hector Plus 6-seater family version ही एसयुव्ही लाँच करणार आहोत", अशी माहिती कंपनीकडून यानिमित्ताने देण्यात आलीये.

    • सध्या ही कार स्टाइल, सुपर, स्मार्ट आणि शार्प अशा चार व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय कारसोबत तीन इंजिन पर्याय मिळतात. हेक्टर पेट्रोल, पेट्रोल हायब्रिड आणि डिझेल इंजिनसह खरेदी करता येईल.
    • 6/25

      एसयुव्हीच्या फ्रंटमध्ये स्लीक क्रोम सराउंडिंग्ससोबत ब्लॅक ग्रिल आहे, त्यामुळे गाडीला शानदार लुक मिळतो. नवीन पद्धतीने पुढील बाजू डिझाइन करण्यात आली आहे. हेक्टरचे हेडलँप बंपरमध्ये आहेत, तर डेटाइम रनिंग लाइट्स (DRL)बरोबर वरती दिल्यात. स्पॉइलरखालील ग्लॉस-ब्लॅक प्लॅस्टिक पिलरमुळे रिअर आणि साइड लुक अजूनच शानदार दिसते.

    • 7/25

      आकर्षक किंमतीमुळे भारतात या कारकडून टाटा हॅरियर, ह्युंडई क्रेटा, निसान किक्स, जीप कंपास यांसारख्या गांड्यांसाठी मोठं आव्हान निर्माण झालंय. या सेगमेंटमध्ये आतापर्यंत टाटाची हॅरियर अव्वल होती. पण हेक्टरच्या आगमनानंतर हे चित्र बदललंय.

    • 8/25

      सध्याचा काळ वायरलेस कनेक्टीविटीचा आहे. मोबाइल, स्मार्टवॉचद्वारे इंटरनेटचा वापर आपण करतच असतो, तर अ‍ॅमेझॉन एको, गुगल होम यांसारख्या उपकरणांना केवळ बोलून आदेश (व्हॉइस कमांड) देऊन अनेक कामे करू शकतो. याच तंत्रज्ञानाचा वापर भारतात पदार्पण करणाऱ्या ‘एमजी मोटर’च्या हेक्टर या एसयूव्हीत करण्यात आला आहे.

    • 9/25

      ही भारतातील पहिली 50 हून जास्त कनेक्टेड फीचर्स असलेली इंटरनेट कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या एसयूव्हीत देण्यात आलेल्या काही सुविधा या श्रेणीत प्रथमच देण्यात आल्या असून भारताच्या एसयूव्ही बाजारात हेक्टर एक दमदार दावेदार ठरतेय.

    • इंटरनेट कनेक्टीविटी हे या गाडीचे वैशिष्ट आहे. हेक्टरमध्ये आयस्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. गाडीतील 10.4 टचस्क्रिन ही सुरक्षित, कनेक्टेड प्रवासाची खात्री करण्यासाठी तयार आहे. भारतीय रस्ते, हवामान आणि भारतीय चालकांना अनुरूप हेक्टरमध्ये मोठय़ा प्रमाणात बदल करण्यात आले आहे.
    • 10/25

      हेक्टर आकाराने मोठी असून इतर एसयूव्हीच्या तुलनेत स्वत:चे वेगळे अस्तित्व दाखवते. हेक्टर 4655 एमएम लांब असून, रुंदी 1835 एमएम आणि उंची 1760 एमएम आहे. हेक्टर ही उंची, रुंदीने बाजारातील या श्रेणीतील इतर एसयूव्हीच्या तुलनेने मोठी आहे. त्याचप्रमाणे हेक्टरचा व्हिलबेस देखील जास्त आहे.

    • 11/25

      आकाराने मोठय़ा असलेल्या या गाडीची चाक 17 इंचांची आहेत. गाडीचे डिजाइन पाहता हेड लाइटची रचना टाटाच्या हॅरियरप्रमाणे आहे. गाडीत डायन्यामिक टर्न इंडिकेटर्स आहेत. पांढऱ्या एलईडी क्वाड प्रोजेक्टर हेडलाइट देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे फॉग लाइट म्हणून एलईडी देण्यात आले आहेत.

    • 12/25

      हेक्टर पेट्रोल आवृत्तीला 1.5 लिटर टर्बो-चार्ज पेट्रोल इंजिनची देण्यात आले आहे. ज्यात 250 एनएमच्या पीक टॉर्कवर 143 पीएस शक्ती उत्पन्न करण्याची क्षमता आहे. हे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रांसमिशन अशा दोन्ही स्वरूपात कार्यरत होईल. याचे 2.0 लिटर डिझेल इंजिन 350 एनएमच्या पीक टॉर्कवर 170 पीएस प्रदान करेल व सोबतच श्रेणीमधील सर्वोत्तम इंधन कार्यक्षमताही प्रदान करेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. 48 व्होल्ट लिथियम-या गाडीत ‘48 व्ही’ हायब्रीड प्रणाली वापरली आहे . उत्सर्जन कमी करण्यासोबतच इंधन-कार्यक्षमता वाढण्यासाठी बनवलेले हे युनिट 20 एनएमपर्यंत अतिरिक्त टॉर्क सहाय्य प्रदान करण्यास ऊर्जेचा संग्रह करते, असा दावा कंपीने केला आहे. 6-स्पीड डीसीटी- डीसीटी हे अतिशय प्रतिष्ठित व परिष्कृत ऑटोमॅटिक ट्रांसमिशन आहे. इतर प्रकारांप्रमाणेच, डीसीटीलाही जागतिक स्तरावर खडतर पर्यावरणाच्या परिस्थितींमध्ये 2.6 दशलक्ष किलोमीटरपेक्षा जास्त तपासण्यात आले असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

    • 13/25

      गाडीच्या पुढच्या बाजूला डॅशबोर्ड आणि डुअर पॅडवर चांगल्या प्रतीच्या प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. डॅशबोर्डवर , इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये लेदरचा वापर करण्यात आला आहे. गाडीच्या केबिनला प्रीमियम दर्जाच्या गाडीसारखे बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गाडीमध्ये अनेक अत्याधुनिक सोयी देण्यात आल्या आहेत. फ्रंट आणि रिअर पार्किंग कॅमेरे, ३६० अंशात चित्रीकरणाची क्षमता असणारा कॅमेरा देण्यात आला आहे. ७ इंचाचा ड्राइवर डिस्प्ले देण्यात आला असून एम्बिएन्ट लाइट दिली आहे. मोठा सनरूफ या गाडीच्या वैशिष्टय़ांमध्ये भर घालतो.

    • 14/25

      गाडीचे केबिन मोठे आणि आरामदायी आहे. मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठी पाय ठेवायला पुरेशी जागा देण्यात आली आहे. पुढची सीट गुडघ्याला लागत नसल्याने तीन जण व्यवस्थितरीत्या मागच्या सीटवर बसू शकतात. गाडीचे फ्लोअर सपाट असल्याने मध्ये बसणाऱ्या व्यक्तीला पाय ठेवण्यासाठी कोणतीच अडचण येत नाही.

    • 15/25

      गाडीत सुरक्षेसाठी दोन ऐअरबॅग, एबीएस, इबीडी, लहान बाळाची सीट ठेवण्यासाठी सुविधा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम, ट्रक्शन कंट्रोल या सुविधा आहेत. गाडीच्या सर्व पर्यायांमध्ये या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गाडीच्या महागडय़ा पर्यायांमध्ये कर्टन ऐअरबॅगसह सहा ऐअरबॅग देण्यात आल्या आहेत. टायरमधील हवेचा दाब पाहण्यासाठी टायर प्रेशर मॉनिटर देण्यात आला आहे. थंडी आणि दमट हवामानाचा परिणाम होऊ नये यासाठी हिटेड विंग प्रणालीचे आरसे देण्यात आले आहेत.

    • 16/25

      हेक्टरमध्ये 10.4 इंचांची टचस्क्रीन देण्यात आली आहे. ही टचस्क्रीन गाडीच्या कमांड सेंटरप्रमाणे काम करते. या टचस्क्रीनद्वारे तुम्ही गाडी नियंत्रित करू शकता. या गाडीत बोलून आदेश समजून घेण्याची यंत्रणा देण्यात आली आहे.

    • 17/25

      ‘हॅलो एमजी’ म्हटल्यावर ही यंत्रणा कार्यरत होते. याद्वारे गाडीची वातानुकूलन यंत्रणा, संगीत प्रणाली नियंत्रित करता येऊ शकते. गाडीचे सनरूफदेखील बोलून आदेश देऊन नियंत्रित करता येते.

    • 18/25

      गाडीला कनेक्टेड कार म्हटले असून गाडीची वातानुकूलन यंत्रणा आणि गाडीचे बूट तुम्ही घरी बसल्या नियंत्रित करू शकता. या अत्याधुनिक सुविधांमुळे ग्राहकांना वाहन चालवण्याचा एक वेगळा अनुभव देण्याच्या एमजीचा प्रयत्न आहे.

    • 19/25

      किंमत – लाँचिंगवेळी कंपनीने या आक्रमक एसयुव्हीच्या बेसिक व्हेरिअंटची एक्स-शोरुम किंमत 12.18 लाख रुपये होती. तर, टॉप व्हेरिअंटची किंमत देखील 16.88 लाख रुपये होती. पण सप्टेंबर महिन्यामध्ये अपेक्षेपेक्षा मिळालेल्या जास्त प्रतिसादानंतर कंपनीने या गाडीच्या किंमतीत वाढ केली. आता हेक्टरच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 12.48 लाख रुपये झाली आहे. तर, टॉप व्हेरिअंटची किंमत देखील 16.88 लाख रुपायांवरुन 17.28 लाख रुपये झाली आहे.

    • 20/25

      एमजी हेक्टरला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता कंपनी काही महिन्यांमध्येच एमजी हेक्टर प्लस ही नवीन सात आसनी शानदार एसयुव्ही घेऊन येणार आहे. या एसयुव्हीबाबतही आतापासूनच ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

TOPICS
ऑटो न्यूजAuto NewsऑटोमोबाइलAutomobileकारCar

Web Title: Mg hector internet suv is a big hit in indian market crossed 50000 bookings know price specifications and all other details sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.