Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. pink floyds roger waters recites aamir azizs anti caa poem sab yaad rakha jayega calls law fascist and racist sas

सब याद रखा जाएगा ! Pink Floyd च्या रॉजर वॉटर्सचा मोदींवर CAA वरुन निशाणा

“ही कविता म्हणजे भारताच्या आत्म्याचा आवाज आहे”

February 28, 2020 15:25 IST
Follow Us
  • पिंक फ्लॉइडचे (Pink Floyd) संगीतकार रॉजर वॉटर्स (Roger Waters) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. वॉटर्स यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही भारतावर निशाणा साधलाय. (छाया सौजन्य - ट्विटर @DEAcampaign)
    1/15

    पिंक फ्लॉइडचे (Pink Floyd) संगीतकार रॉजर वॉटर्स (Roger Waters) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. वॉटर्स यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही भारतावर निशाणा साधलाय. (छाया सौजन्य – ट्विटर @DEAcampaign)

  • 2/15

    व्हायरल व्हिडिओमध्ये रॉजर वॉटर्स हे आमिर अजीजच्या 'सब याद रखा जाएगा' या कवितेचं इंग्रजी भाषांतर वाचताना दिसत आहेत.

  • 3/15

    व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, "आयुष्यभर शांततेसाठी झगडणाऱ्या संगीतकारांनीही भारतातील हत्याकांडाची दखल घ्यायला सुरूवात केलीये. आता जगाने दखल घेण्याची वेळ आली आहे. इतिहासाच्या योग्य बाजूने उभे राहा", असे ट्विट करत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतावर टीका केली.

  • 4/15

    जगातील दिग्गज रॉक बँड्समध्ये समावेश असलेल्या Pink Floyd बँडचे को-फाउंडर आणि गिटारिस्ट रॉजर वॉटर्स दोन दिवसांपूर्वी लंडनमध्ये एका इव्हेंटमध्ये उपस्थित होते. विकिलीक्सचे संस्थापक जूलियन असांज(Julian Assange) यांच्या सूटकेसाठी ते निदर्शन करत होते.

  • यावेळी रॉजर वॉटर्स यांनी 'सब याद रखा जाएगा' या कवितेद्वारे भारतात लागू झालेल्या सीएए कायद्याचा विरोध केला.
  • त्यांनी भारतात सीएए कायद्याविरोधात सुरू असलेल्या विरोध प्रदर्शनाचा उल्लेख केला आणि कवी आमिर अजीजची कविता 'सब याद रखा जाएगा'चा काही भाग इंग्रजी व्हर्जनमध्ये ऐकवला. तसेच, भारतात सुरू असलेल्या सीएए विरोधी आंदोलनाला आपले समर्थन दिले.
  • 5/15

    कवितेचं इंग्रजी भाषांतर वाचण्याआधी, "आमिर अजीज युवा कवी आणि सामाजिक कार्यकर्ता आहे. तो दिल्लीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या 'फॅसिस्ट व रेसिस्ट नागरिकत्व कायद्या'विरोधात लढा देतायेत", अशा शब्दांमध्ये वॉटर्स यांनी आमिर अजीजची ओळख सांगितली. (छाया सौजन्य – ट्विटर @iamdivyakrish)

  • 6/15

    कवितेचा काही भाग वाचून झाल्यानंतर वॉटर्स हे अजीजच्या लेखनाने चांगलेच प्रभावित झाले आणि या मुलाचं भविष्य उज्ज्वल असल्याचं ते म्हणाले. (छाया सौजन्य – ट्विटर @_taylorhudak)

  • 7/15

    "ही कविता म्हणजे भारताच्या आत्म्याचा आवाज आहे", असेही वॉटर्स यावेळी म्हणाले. (छाया सौजन्य – ट्विटर @21WIRE)

  • 8/15

    वॉटर्स हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यावरही सतत टीका करत असतात. (छाया सौजन्य – ट्विटर @KhabreeM)

  • 9/15

    पाटणामध्ये जन्मलेला आणि सिव्हिल इंजिनिअरींगची पदवी घेतलेला आमिर अजीज एक लेखक आणि संगीतकार आहे. कविता व्हायरल झाल्यानंतर तो चर्चेत आला.

  • आमिर अजीजने 16 फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये 'इंडिया, माय व्हॅलेंटाइन’ कार्यक्रमात कविता “सब याद रखा जाएगा…सब कुछ याद रखा जाएगा” सादर केली होती. त्यानंतर अजीजची ही कविता मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. (छाया सौजन्य – ट्विटर @wikileaks)
  • 10/15

    2013 मध्ये पिंक प्लॉइड बँडच्या 250 मिलियन कॉपी विक्री झाली होती. 'डार्क साइड ऑफ दि मून' आणि 'दि वॉल' यांसारख्या अल्बमचा समावेश तर जगातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या अल्बममध्ये होतो. (छाया सौजन्य – ट्विटर @robpowellnews)

  • 11/15

    पिंक फ्लॉइड या लंडनच्या 'सायकेडेलिक रॉक बँड'चा समावेश जगातील सर्वात प्रभावशाली रॉक बँडमध्ये होतो. (छाया सौजन्य – ट्विटर @wikileaks)

  • 12/15

    भारतातही गेल्या अनेक वर्षांपासून उच्च मध्यमवर्गांमधील पिढ्या 'पिंक फ्लॉइड'ची गाणी ऐकून मोठ्या झाल्या आहेत. (छाया सौजन्य – ट्विटर @wikileaks)

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra ModiसीएएCAA

Web Title: Pink floyds roger waters recites aamir azizs anti caa poem sab yaad rakha jayega calls law fascist and racist sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.