• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. noth indian migrants from the city continues with hundreds choosing to start walking towards their home states psd

मोडून पडला संसार, आता फक्त घराची आस

कामगारांचा घराच्या दिशेने प्रवाल सुरु

May 14, 2020 17:34 IST
Follow Us
  • लॉकडाउनमुळे आपल्या घरापासून दूर अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना प्रवास करण्याची परवानगी अखेरीस केंद्र सरकारने दिली. यानंतर मुंबई, पुणे यासारख्या महत्वाच्या शहरांमधून परप्रांतीय कामगार आपल्या घराकडे निघाले आहेत. करोनाने आपला संसार मोडला असला तरीही उरलीसुरली जिद्द मनात घेऊन हे कामगार पायी घर गाठत आहेत. (सर्व छायाचित्र - पवन खेंगरे)
    1/15

    लॉकडाउनमुळे आपल्या घरापासून दूर अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना प्रवास करण्याची परवानगी अखेरीस केंद्र सरकारने दिली. यानंतर मुंबई, पुणे यासारख्या महत्वाच्या शहरांमधून परप्रांतीय कामगार आपल्या घराकडे निघाले आहेत. करोनाने आपला संसार मोडला असला तरीही उरलीसुरली जिद्द मनात घेऊन हे कामगार पायी घर गाठत आहेत. (सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)

  • 2/15

    उत्तर प्रदेश-बिहारमधून आलेले हे कामगार पुण्यातून पायी चालत आपल्या घराकडे निघाले आहेत. सध्या दिवसा सूर्यनारायणाचा वाढता प्रकोप पाहता या कामगारांनी फक्त रात्री प्रवास करण्याचं ठरवलं आहे.

  • 3/15

    आपल्या लहानग्यांना शहराची स्वप्न दाखवत पुण्यात आलेला हा बाप आता आपल्या घरी जाताना काय विचारत असेल. करोनामुळे हातचा रोजगार तुटला आता आपल्या लेकराला पाठीवर बसवत मजल-दरमजल करत घर गाठायचं एवढाच विचार मनात आहे.

  • 4/15

    आपलं सगळं सामान-सुमान बांधून डोक्यावर घ्यायचं, मुलाबाळांना कडेवर घ्यायचं आणि प्रवासाला सुरुवात करायची हे कामगारांनी ठरवलंय.

  • 5/15

    कामगारांना आपल्या घरी जाण्यासाठी केंद्राने विशेष गाड्यांची सोय केली आहे. मात्र रोजगार तुटलेल्या काही कामगारांच्या नशिबात हा पर्यायही उपलब्ध नाही.

  • 6/15

    सरतेशेवटी रस्त्याने प्रवास करत वाटेत जे कोणंत वाहन मिळेल त्यातून पुढे जायचं हे या कामगारांनी ठरवलंय.

  • 7/15

    घर गाठेपर्यंतचा प्रवास फार मोठा आहे, त्यात रात्रीच प्रवास करायचं ठरवल्यामुळे जितकं लवकर जास्त अंतर कापता येईल तितकं कापायचं हे या कामगारांनी ठरवलंय.

  • 8/15

    मजल-दरमजल करत असताना मध्येच या कष्टकऱ्यांना आपल्यासारखेच कोणीतरी भेटतात, मग त्यांच्या जोडीने सुरु होतो पुढचा प्रवास…

  • 9/15

    अशा प्रवासादरम्यान सामानाचं ओझ हलकं करण्यासाठी मग अशी शक्कल लढवली जाते.

  • 10/15

    रात्रीच्या प्रवासात अपघाताचीही भीती असतेच…अशावेळी आपल्या मुलांची शक्य तितकी काळजी घेत सांभाळून हा प्रवास सुरु असतो.

  • 11/15

    करोना आणि लॉकडाउन काळात या कामगारांनी एवढं काही सोसलं आहे की आता आपलं घर गाठण्यापलीकडे यांच्याजवळ कोणताही पर्याय शिल्लक नाही. हा दिव्यांग कामगाराची जिद्दच सर्वकाही बोलून जाते.

  • 12/15

    रात्रीच्या प्रवासात मोठा पल्ला गाठला की शरीर थकतं, मग रस्त्याच्या कडेला थोडावेळ थांबून आराम केला जातो…

  • 13/15

    आराम झाला की आपलं सामान डोक्यावर घेऊन, मुलांना सोबत घेऊन मग हे कामगार पुन्हा एकदा आपल्या घराच्या दिशेने प्रवास सुरु करतात.

  • 14/15

    हा प्रवास इतका मोठा असतो की लहानगी मुलं थकतात, अशावेळी आपल्या बाबांच्या खांद्यावर मान टाकून ती झोपतात. पण बाबांच्या मनात घरं कसं गाठायची ही चिंता कायम असते.

  • 15/15

    देशातील अनेक मजूर सध्या असं संघर्षमय जिवन जगत आहेत, करोनाने त्यांच्यावर वेळच तशी आणली आहे.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Noth indian migrants from the city continues with hundreds choosing to start walking towards their home states psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.