-
नवी मुंबई : शहरात दिवसेंदिवस कोविडच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढतच आहे. यापार्श्वभूमीवर प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये आता आरोग्य विभागानं घरोघरी जाऊन लोकांची तपासणी करण्याचं धोरणं अवलंबल आहे. (सर्व छायाचित्रे – अमित चक्रवर्ती)
-
नवी मुंबईतील बेलापूरमधील प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित असलेल्या दिवाळे गावात जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांनी मंगळवारी लोकांचं स्क्रिनिंग केलं.
-
आरोग्य विभागाचे किमान दोन कर्मचारी घरोघरी जाऊन ही तपासणी करीत आहेत. यांपैकी एक जण तपासणी तर दुसरी व्यक्ती त्याची नोंद ठेवण्याचे काम करीत आहे.
-
स्वतःच्या सुरक्षेसाठी हे कर्मचाऱ्यांना पीपीई किट घालून घरोघरी भेट देत आहेत.
-
तपासणी करताना कर्मचाऱ्यांनी पूर्ण सुरक्षितता बाळगली असली तरी फिजिकल डिस्टंसिंगचेही ते कसोशीने पालन करीत आहेत.
-
स्क्रिनिंगबरोबरच नागरिकांनी कोविड आजाराबद्दलची माहिती आणि खबरदारीचे उपाय घेण्यासंबंधीची माहिती असलेली पत्रकंही वाटतं आहेत.
-
प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनीही आरोग्य विभागाच्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला आहे.
कंटेन्मेंट झोनमध्ये आता घरोघरी तपासणी
Web Title: Door to door covid screening inside the containment zone of diwale gaon in belapur navi mumbai asy