Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. rakhee sellers are in trouble as no demand for their product due covid 19 pandemic kjp 91 psd

रक्षाबंधनावरही करोनाचं सावट : मालाची विक्री न झाल्याने दुकानदार चिंतेत

July 31, 2020 15:53 IST
Follow Us
  • सध्या संपूर्ण देशभरात करोनामुळे आणीबाणीसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील अनेक सणांवरही या विषाणूचं सावट आहे. तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनाच्या संकटावरही या विषाणूच्या प्रादुर्भावाचं सावट आहे. (सर्व फोटो - कृष्णा पांचाळ)
    1/

    सध्या संपूर्ण देशभरात करोनामुळे आणीबाणीसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील अनेक सणांवरही या विषाणूचं सावट आहे. तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनाच्या संकटावरही या विषाणूच्या प्रादुर्भावाचं सावट आहे. (सर्व फोटो – कृष्णा पांचाळ)

  • 2/

    यंदा विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक भावा-बहिणींनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम रद्द केला आहे. त्यामुळे बाजारात राख्यांना फारशी मागणी नाही.

  • 3/

    करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यातच मालाला असलेली कमी मागणी यामुळे राखी व्यवसायिक चिंतेत आहेत. पिंपरी-चिंचवडमधील दुकानं ओस पडलेली पहायला मिळाली.

  • 4/

    एरवी रक्षाबंधन सण काही दिवसांवर आलेला असताना राखी विकत घेण्यासाठी दुकानांमध्ये महिला वर्ग गर्दी करायचा, परंतू यंदा करोनाच्या भीतीमुळे परिस्थिती बदलून गेली आहे.

  • 5/

    आतापर्यंत फक्त ३० टक्के मालच विकला गेल्याचं पिंपरी-चिंचवडमधील काही दुकानदारांनी सांगितलं.

  • 6/

    अनेक दुकानांमध्ये ७० टक्के माल पडून आहे, त्यामुळे त्या मालाचं करायचं काय आणि नुकसान कसं भरुन काढायचं अशा चिंतेत दुकानदार पडले आहेत.

  • 7/

    लॉकडाउनच्या काळातही बाजारात राख्यांच्या डिजाईनमध्ये वैविध्य दिसत आहे. मोठ्या मुलांपासून ते लहानांना आवडणाऱ्या कार्टुनच्या राख्याही बाजारात आहेत.

  • 8/

    करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राख्यांचे दरही किमान २० टक्क्यांनी वाढले आहेत.

  • 9/

    नाव लिहिलेली राखी, एक्रेलिक बोर्ड फ्रेम, वूडन अथवा बांबूच्या राख्याही उपलब्ध झाल्या आहेत. माणिक आणि खडय़ांच्या राख्यांचीही मागणी जोरात आहे.

  • 10/

    टाळेबंदीमुळे सर्वानाच आर्थिक चणचण जाणवत असल्याने यंदा राखीचा सण साधेपणाने साजरा करण्याकडे अनेकांचा कल आहे.

  • 11/

    २० रुपयांपासून ते २ हजार रुपयापर्यंतची राखी यंदा बाजारात आहे, परंतू महागड्या राख्या सोडा..साध्या राख्यांनाही यंदा बाजारात फारशी मागणी नाही.

  • 12/

    भाऊ-बहिणीचं नातं दृढ करणारा रक्षाबंधन हा सणही यंदा करोनाच्या विळख्यात सापडला आहे.

TOPICS
रक्षाबंधन २०२५Raksha Bandhan 2025

Web Title: Rakhee sellers are in trouble as no demand for their product due covid 19 pandemic kjp psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.