-

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले.
-
आषाढीनिमित्त विठ्ठल मंदिरासहीत सर्वच मंदिरांना फुलांची विशेष सजावट करण्यात आली होती.
-
आषाढी एकादशीनिमित्त श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फुलांची विशेष सजावट करण्यात आली होती.
-
विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याची सजावट पंढऱ्या फुलांनी करण्यात आलीय.
-
रंगीबेरंगी फुलांनी रुक्मिणी मंदिराचं प्रवेशद्वार सजवण्यात आलं आहे.
-
फुलांच्या सजावटीमुळे मंदिर फार सुंदर दिसत आहे.
-
विठूरायाकडे तर पाहतच रहावे असं त्याचं सोज्वळ रुप…
-
रुक्मिणी मंदिराच्या सजावटीमध्ये सफरचंदाचा वापर करण्यात आलाय.
-
यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी निर्बंधांमध्ये आषाढीचा सोहळा पार पडत असल्याने भाविकांची संख्या मर्यादित ठेवण्यात आलीय.
-
रुक्मिणी मातेचे रुपही फारच सुंदर दिसत आहे.
-
मंदिर समितीने या छायाचित्राचे पुस्तक स्वरुपात जतन करुन हा वारसा जगापुढे ठेवावा, असं मुख्यमंत्री म्हणाले.
-
पंढरपूर नगरपरिषदेस राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या यात्रा अनुदानाच्या पाच कोटी रुपये रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. महापुजेनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले.
रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी… पंढरपूरच्या मंदिरातील फुलांनी सजलेला गाभार तुमचेही मन प्रसन्न करेल
आषाढी एकादशीनिमित्त श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फुलांची विशेष सजावट करण्यात आलीय
Web Title: Ashadha ekadashi 2021 pandharpur maharashtra cm uddhav thackeray mahapuja flower decoration photos scsg