-  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील काशी विश्वनाथ धाम येथे काम करणाऱ्या कामगारांसाठी जूट चपलांच्या १०० जोड्या पाठवल्या आहेत.
 -  
काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनासाठी वाराणसीच्या भेटीदरम्यान, इथले अनेक कामगार अनवाणी पायांनी काम करत असल्याचं पंतप्रधान मोदींना कळालं.
 -  
त्यानंतर त्यांनी या कामगारांसाठी १०० जोड्या चपला पाठवल्या.
 -  
मंदिराच्या आवारात चामड्याचे किंवा रबराची चप्पल किंवा जोडे घालण्यास मनाई आहे.
 -  
या नियमांचं पालन पुजारी, सेवा करणारे लोक, सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी आणि इतरही लोक करतात.
 -  
त्यामुळे या कामगारांना अनवाणी पायांनी काम करावं लागतंय.
 -  
म्हणून पंतप्रधानांनी ताबडतोब १०० जोड्या ज्यूटच्या चपला खरेदी करून काशी विश्वनाथ धाम येथे पाठवल्या. जेणेकरून कामगारांना थंडीच्या वातावरणात अनवाणी पायांनी काम करावं लागणार नाही.
 -  
“काशी विश्वनाथ धाम येथे काम करणारे लोक खूप आनंदी होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पंतप्रधान सगळीकडे बारकाईने लक्ष देतात आणि त्यांना गरीबांची किती काळजी आहे, याचं हे आणखी एक उदाहरण आहे,” असं एका सूत्राने पीटीआयला सांगितले.
 -  
गेल्या महिन्यात पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर होते.
 -  
पंतप्रधान मोदींनी काशी विश्वनाथ कॉरिडॉर बांधणाऱ्या कामगारांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला होता.
 -  
नंतर त्यांच्यासोबत जेवण देखील केले होते.
 -  
पंतप्रधान मोदींनी काशी कॉरिडोरचे उद्घाटन केल्यानंतर मंदिरात पुजा केली होती, तसेच गंगेत डुबकी देखील मारली होती. (photo -ANI and PTI)
 
पंतप्रधान मोदींची अनोखी भेट! काशी विश्वनाथमधील कामगारांसाठी पाठवले ज्युटच्या चपलांचे १०० जोड
पंतप्रधान मोदींनी काशी विश्वनाथ धाम येथे काम करणाऱ्या कामगारांसाठी जूट चपलांच्या १०० जोड्या पाठवल्या आहेत.
Web Title: Pm modi sends 100 pairs of jute footwear for construction workers of kashi vishwanath dham hrc