• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. lata mangeshkar gankokila to bharat ratna the melodious journey of latadidi immortalized by nectar ttg

Lata Mangeshkar: गानकोकिळा ते भारतरत्न; अमृत स्वरांनी अजरामर झालेला लतादीदींचा सुरेल प्रवास

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला.

Updated: February 6, 2022 11:43 IST
Follow Us
  • प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांचे रविवारी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मंगेशकर यांनी दीर्घकाळ रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर मुंबईत अखेरचा श्वास घेतला.  (Photo: Express Archive)
    1/19

    प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांचे रविवारी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मंगेशकर यांनी दीर्घकाळ रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर मुंबईत अखेरचा श्वास घेतला.  (Photo: Express Archive)

  • 2/19

    १९२९ मध्ये मराठी संगीतकार आणि नाट्य अभिनेते पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या पोटी जन्मलेल्या लतादीदींनी वयाच्या १३ व्या वर्षी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली.  (Photo: Express Archive)

  • 3/19

    त्यांनी किती हसाल (१९४२) साठी “नाचू या गडे, खेलू सारी मनी हौस भारी” हे मराठी गाणे गायले.  (Photo: Express Archive)

  • 4/19

    १९४८ मध्ये लता मंगेशकर यांना गुलाम हैदर यांनी मार्गदर्शन केले होते. Glamsham.com ने एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या की, “गुलाम हैदर हे खरोखर माझे गॉडफादर आहेत. ते पहिले संगीत दिग्दर्शक होते ज्यांनी माझ्या टॅलेंटवर पूर्ण विश्वास दाखवला.” (Photo: Express Archive)

  • 5/19

    लता मंगेशकर यांचं पहिलं यशस्वी गाणं होतं चव महल (१९४९) मधील “आयेगा आनेवाला”. वरील फोटोत- किशोर कुमार एका कार्यक्रमात लता मंगेशकर यांचा सत्कार करताना.  (Photo: Express Archive)

  • 6/19

    मराठी आणि हिंदीमध्ये गाल्यानंतर, लता मंगेशकर यांनी सिंहली, तमिळ, बंगाली आणि इतर भाषांमध्येही गाणी गायली. वरील फोटोत- लता मंगेशकर संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना यांच्याशी संवाद साधत आहेत.  (Photo: Express Archive)

  • 7/19

    “प्यार किया तो डरना क्या”, “अजीब दास्तान है ये,” “ए मेरे वतन के लोगो”, “आप की नजरों ने समझा”, “कहीं दीप जले कहीं दिल” यासह लता मंगेशकरांची अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत. (Photo: Express Archive)

  • 8/19

    लता मंगेशकर यांनी मोहित्यांची मंजुळा (१९६३), मराठा तितुका मेळवावा (१९६४), साधी माणसं (१९६५) आणि तांबडी माती (१९६९) यांना संगीत दिले. (Photo: Express Archive)

  • 9/19

    लता मंगेशकर यांना भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि लीजन ऑफ ऑनर यासह अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले.  (Photo: Express Archive)

  • 10/19

    किशोर कुमार, कल्याणजी आणि लता मंगेशकर एका रेकॉर्डिंगसाठी स्टुडिओत असताना. (Photo: Express Archive)

  • 11/19

    मिनू कात्रक, भूपेन हजारिका, उत्पला सेन, लता मंगेशकर, असित सेन आणि हेमंत कुमार यांचा दुर्मिळ फोटो.  (Photo: Express Archive)

  • 12/19

    राज कपूर आणि नर्गिस यांच्यासमवेत लता मंगेशकर  (Photo: Express Archive)

  • 13/19

    एका कार्यक्रमात हसरत जयपुरी, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी.  (Photo: Express Archive)

  • 14/19

    भारतरत्न लता मंगेशकर यांच्या खासदार निधीतून कोल्हापुरात उभारण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन दीदींच्या हस्ते झाले .समवेत दिवंगत मंत्री दिग्विजय खानविलकर , माजी खासदार निवेदिता माने.

  • 15/19

    दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुण्यात उभारण्यासाठी केलेल्या निधी संकलन कार्यक्रमातील (फोटो:पत्रकार उदय कुलकर्णी यांच्या संग्रहातून)

  • 16/19

    करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते २०१८ मध्ये लता मंगेशकर यांना स्वर माऊली हा पुरस्कार देण्यात आला. हा त्यांना मिळालेला शेवटचा पुरस्कार होता. (फोटो सौजन्य- दिलीप शेंडे)

  • 17/19

    सांगली महापालिकेच्यावतीने २७/ २/ २००० रोजी लता मंगेशकर यांना तत्कालीन महापौर सुरेश पाटील यांच्या हस्ते सुवर्णाक्षरांनी लिहिलेले मानपत्र प्रदान करण्यात आले.

  • 18/19

    इचलकरंजीतील किर्तनकार शेंडे आणि संगीत शिक्षक दिलीप शेंडे या दोन पिढ्यांचे मंगेशकर कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. लतादीदींच्या केसांमध्ये फूल माळताना शेंडे.

  • 19/19

    इचलकरंजीतील पंडित बाळकृष्ण बुवा संगीत साधना मंडळाच्या भेटीप्रसंगी लता मंगेशकर, पु. ल. देशपांडे , मंडळाचे अध्यक्ष गजाननराव कांबळे आणि मंडळाचे पदाधिकारी.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Lata mangeshkar gankokila to bharat ratna the melodious journey of latadidi immortalized by nectar ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.