-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी निवडणूक प्रचारात छाती ठोकून बैलगाडी शर्यतीबाबत दिलेला शब्द अखेर पूर्ण केला.
-
अमोल कोल्हे यांनी बारीत हा सोडून घोडेस्वारी केली.
-
तसेच घोडेस्वारीचा शब्द पाळल्यानंतर त्यांनी दंड आणि मांड्या थोपटत शब्दपूर्तीचा आनंदही व्यक्त केला.
-
त्यांनी स्वतः याबाबतचा जुना आणि घोडेस्वारी पूर्ण केल्याचा एक व्हिडीओ ट्वीट केलाय.
-
हा व्हिडीओ पोस्ट करताना आज घाटात घोडी धरली आणि भंडाराही उधळला, असंही त्यांनी नमूद केलं.
-
अमोल कोल्हे ट्वीटमध्ये म्हणाले, “भिर्रर्रर्र..! कुलदैवत खंडोबाच्या चरणी नतमस्तक होऊन आज घाटात घोडी धरली आणि भंडाराही उधळला.”
-
अमोल कोल्हे यांनी घोडेस्वारी केली तेव्हा हजारो लोक उपस्थित होते.
-
घोडेस्वारी करताना अमोल कोल्हे यांनी हातातून लगाम सोडला आणि दोन्ही हाताने उपस्थितांना अभिवादन केले.
-
यावेळी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.
-
कोल्हेंनी हात सोडून घोडेस्वारी केल्यानंतर उपस्थितांनी चांगलाच जल्लोष केला.
-
यावेळी अनेक नागरिकांनी अमोल कोल्हे यांची घोडेस्वारी आपल्या कॅमेरात कैद केली.
-
कोल्हे यांनी यशस्वीपणे घोडेस्वारी केल्यानंतर उपस्थित तरुणांनी नाचत आनंद व्यक्त केला.
-
घोडेस्वारीनंतर अमोल कोल्हे यांनी शिवाजी आढळराव पाटलांसह विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
-
अमोल कोल्हे म्हणाले, “जेव्हा तुमच्यावर प्रश्न उपस्थित केले जातात. तेव्हा महाराजांची शिकवण आहे भिंतीला पाठ लागल्यानंतर उसळायचं असतं. त्यामुळे ज्यांना घोडी धरेल की नाही अशी शंका होती त्यांना उत्तर मिळालंय. दोन्ही हात सोडून अख्खा घाट घोडेस्वारी केलीय. संसदेचं काम सुरू असताना घाटात येणं शक्य नसल्याने आत्ता घोडेस्वारी केली.”
-
“घाटात घोडी चालवण्याचा हा माझा पहिला अनुभव आहे. पण जनावरांची एक भाषा असते, त्यांच्यासोबत एक नातं असतं. मुक्या प्राण्याशी सर्वसामान्य शेतकऱ्याचं एक नातं असतं. जसं माझं माझ्या घोडीशी नातं आहे. त्यामुळे मी तिला सांगितलं माझी काळजी तू घे, तुझी काळजी मी घेतो,” असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.
-
अमोल कोल्हे म्हणाले, “अनेकांना वाटतं चित्रिकरण सोपं असतं, पण ना चित्रिकरण सोपं असतं, ना ही प्रत्यक्षातील घोडेस्वारी सोपी आहे. आव्हान समोर आलं की भिडायचं असतं. आव्हानाला भिडलं की आव्हान सोपं होतं.”
-
“यापुढील काळातही बैलगाडीची आणखी लोकप्रियता वाढवण्यासाठी प्रयत्न करू. त्यातून पर्यटन, ग्रामीण रोजगार याला नक्कीच प्रयत्न करत राहू,” असं कोल्हेंनी सांगितलं.
-
“बैलगाडी शर्यतीचा प्रश्न अद्याप पूर्ण सुटलेला नाही. त्यावर पाच सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. त्यासाठी दस्तावेजीकरण आणि इतर पाठपुरावा आम्ही करू,” असंही त्यांनी नमूद केलं.
Photos : “घाटात घोडी धरली आणि भंडाराही उधळला”, अमोल कोल्हेंचे हात सोडून घोडेस्वारीचे फोटो
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी निवडणूक प्रचारात छाती ठोकून बैलगाडी शर्यतीबाबत दिलेला शब्द अखेर पूर्ण केला.
Web Title: Photos of amol kolhe participating in horse race in front of bullock cart pune pbs