-
हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. भगवान शंकराची पूजा करणाऱ्यांसाठी महाशिवरात्री हा दिवस खास असतो.
-
या सणानिमित्त सकाळपासून भाविकांच्या रांगा मंदिराबाहेर लागल्याचं पाहायला मिळत आहे. करोना काळात बंद असलेली मंदिरं यंदाच्या महाशिवरात्रीला भाविकांसाठी खुली करण्यात आहे.
-
त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आलेली आहे.
-
भाविकांकडून शिवमंदिरात शिवलिंगावर बेलपत्र आणि दूध-पाण्याचा अभिषेक केला जातो. या निमित्ताने ठिकठिकाणी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
-
पुण्यातल्या जंगली महाराज रस्ता परिसरातील पाताळेश्वर मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. हे फोटो घेतलेत अरुल होरायझन यांनी.
-
पुण्यातील बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त ५१ किलो चक्का वापरून पिंड साकारण्यात आली आहे. ही पिंड तयार करण्यास ३ तास लागले आहेत.
-
यामध्ये द्राक्ष, सुकामेवा, फळ, बेल, फुले हे साहित्य वापरुन आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ही पिंड पाहण्यास भाविकांनी एकच गर्दी केली आहे.
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याही महादेवाच्या दर्शनासाठी आल्या होत्या.
-
त्यांनीही अशाच प्रकारे एक छोटी पिंड चक्क्यापासून तयार केली.
उद्धव ठाकरे यांना धक्का, शिवसेनेच्या माजी आमदारांच्या पत्नी शिंदे गटात