-
सध्या देशभरामध्ये चर्चेत असणारा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांनी आज पाहिला.
-
या कार्यक्रमाला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत चित्रपटातील कलाकारही उपस्थित होते.
-
देवेंद्र फडणवीसांसोबतच प्रवीण दरेकर, आशीष शेलार. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे हे नेतेही उपस्थित होते.
-
देवेंद्र फडणवीस यांनीच या विशेष स्क्रीनसंदर्भातील फोटो ट्विटरवरुन शेअर केलेत.
-
या चित्रपटातील कलाकारांसोबत फडणवीस आणि भाजपा नेत्यांनी चर्चाही केली.
-
या सुंदर चित्रपटाच्या माध्यमातून कलाकारांनी काश्मीरसंदर्भातील सत्य समोर आणलं आहे. त्यांचं कौतुक केलं पाहिजे असंही फडणवीस यांनी म्हटलंय.
-
यावेळी कलाकारांचा सत्कारही करण्यात आला.
-
‘द कश्मीर फाइल्स’ला पुढील वाटचालीसाठी फडणवीस यांनी शुभेच्छाही दिल्या.
-
हा चित्रपट सर्व विक्रम मोडीत काढो आणि अधिक यशस्वी होवो, अशी इच्छा व्यक्त करत फडणवीस यांनी चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.
-
सर्वांनी हा चित्रपट पहावा असं मी आवाहन करतो, असंही फडणवीस चित्रपटाचं कौतुक करताना म्हणालेत.
-
सत्य हे कायमच सत्य असतं. या चित्रपटाला विरोध करणारे तेच लोक आहेत ज्यांना पुढील पिढीला सत्य कळू नये असं वाटत आहे, असं फडणवीस यांनी चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलंय.
-
‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ऐतिहासिक आणि खऱ्या घटनांवर आधारित आहे. यामध्ये काश्मीरसंदर्भातील सत्य सांगण्यात आलंय, असंही फडणवीस यांनी म्हटलंय. (सर्व फोटो देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटरवरुन साभार)
Photos: भाजपा नेत्यांनी, आमदारांनी पाहिला Kashmir Files; फडणवीस म्हणाले, “चित्रपटाला विरोध करणारे…”
चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर हे सुद्धा फडणवीसांसोबत उपस्थित होते., चित्रपट संपल्यानंतर फडणवीस यांनी एक इच्छा व्यक्त केली.
Web Title: Devendra fadnavis and maharashtra bjp leaders watch the kashmir files actress pallavi joshi was also present scsg