Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. photos raj thackeray left pune for aurangabad for a meeting msr

PHOTOS : चारही वेदांमधील मंत्रोच्चारांद्वारे आशीर्वाद घेऊन राज ठाकरे पुण्यातून औरंगाबादच्या सभेसाठी झाले रवाना

राज ठाकरे उद्याच्या सभेत नेमकं काय बोलणार? याची राजकीय पक्षांसह सर्वसामान्यांना देखील मोठी उत्सुकता आहे

Updated: April 30, 2022 14:51 IST
Follow Us
  • महाराष्ट्र दिनी म्हणजे १ मे रोजी(उद्या) औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. (फोटो - आशिष काळे आणि सागर कासार)
    1/18

    महाराष्ट्र दिनी म्हणजे १ मे रोजी(उद्या) औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. (फोटो – आशिष काळे आणि सागर कासार)

  • 2/18

    या बहुचर्चित सभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज सकाळी पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झाले.

  • 3/18

    मात्र तत्पूर्वी ही आणि भविष्यातील सर्व सभा निर्विघ्नपणे पार पडाव्यात यासाठी राज ठाकरे यांना आशीर्वाद देण्यात आले.

  • 4/18

    यासाठी पुण्यातील जवळपास १०० ते १५० पुरोहितांनी चारही वेदांमधील मंत्रोच्चारांचे पठण करत राज ठाकरे यांना आशीर्वाद दिला.

  • 5/18

    यासाठी पुण्यातील राजमहाल येथे सकाळीच ब्रह्मवृंद मोठ्यासंख्येने हजर देखील झाले होते.

  • 6/18

    आज पुण्यातून राज ठाकरे औरंगाबादला रवाना होणार असल्याने सकाळपासूनच मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह माध्यम प्रतिनिधींनी मोठ्या संख्यने राजमहाल येथे गर्दी केली होती.

  • 7/18

    सकाळी साधारण दहा वाजेच्या सुमारास राज ठाकरे बाहेर आले, यानंतर त्यांना उपस्थित पुरोहितांनी मंत्रोच्चार करून आशीर्वाद दिले.

  • 8/18

    राज ठाकरे यांच्या उद्याच्या आणि पुढील सभेत यश प्राप्त होण्यासाठी संपूर्ण पुणे शहराच्या वतीने आणि पुरोहित वर्गाच्या वतीने आम्ही मंत्रांद्वारे आशीर्वाद देणार असल्याचे गुरुजी मनोज पारगावकर म्हणाले.

  • 9/18

    दीर्घ आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त व्हावे आणि त्यांची जी हिंदूजननायकाची भूमिका आहे. त्या करिता मंत्रांचा, दैवतांचा आशीर्वाद आणि पाठींबा देण्यासाठी आम्ही आलो आहोत, असंही ते म्हणाले.

  • 10/18

    तसेच, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांमधील मंत्रांचा आशीर्वाद दिला जाणार असल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली होती.

  • 11/18

    राज ठाकरे यांची बहुचर्चित अशी औरंगाबाद येथील सभा उद्या होणार असून त्याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आहे.

  • 12/18

    औरंगाबादला जात असताना राज ठाकरे वढू-तुळपूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देणार आहेत.

  • 13/18

    या ठिकाणी राज ठाकरे समाधी स्थळाचं दर्शन घेऊन पुढील दौऱ्यासाठी निघणार असल्याचं, मनसे शहारध्यक्ष साईनाथ बाबर यांनी स्पष्ट केलंय.

  • 14/18

    राज ठाकरेंच्या या सभेबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

  • 15/18

    शिवाय, या सभेच्या अगोदर देखील परवानगी नाट्य रंगल्याचं दिसून आलं होतं, अखेर ही सभा नियम आणि अटींसह होणार आहे.

  • 16/18

    औरंगाबादेतील राजकीय परिस्थिती पाहता, राज ठाकरे नेमकं काय बोलतील आणि त्याचे काय पडसाद उमटू शकतात, याबाबत देखील चर्चा सुरू आहे.

  • 17/18

    राज ठाकरेंची आज चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेता अंकुश चौधरी यांनी देखील भेट घेतली.

  • 18/18

    औरंगाबादच्या सभेसाठी राज ठाकरे रवाना होत असताना शंखनाद देखील केला गेला.

TOPICS
मनसेMNSराज ठाकरेRaj Thackeray

Web Title: Photos raj thackeray left pune for aurangabad for a meeting msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.