• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. prime minister narendra modi inaugurated maharashtra saint tukaram maharaj temple in dehu pune photos sdn

PM Modi Maharashtra Visit Photos: संत तुकारामांपुढे पंतप्रधान मोदी नतमस्तक; म्हणाले, “देहूत येऊन…”

Narendra Modi to Visit Pune & Mumbai, 14 june 2022 | आषाढी वारीसाठी सोमवारी (२० जून) तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून, त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

Updated: June 14, 2022 15:23 IST
Follow Us
  • PM Modi Maharashtra Visit Live, PM Modi Pune & Mumbai Visit Today
    1/15

    जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (१४ जून) श्रीक्षेत्र देहू येथे आले आहेत.

  • 2/15

    आषाढी वारीसाठी सोमवारी (२० जून) तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून, त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

  • 3/15

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने पुणे विमानतळावर आगमन झाले.

  • 4/15

    त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख तसेच इतर नेते उपस्थित होते.

  • 5/15

    २० मिनिटांच्या या लोकार्पण सोहळ्यानंतर त्यांनी सभेला संबोधित केले.

  • 6/15

    “शास्त्रात सांगितलं आहे की संतांची अनुभूती झाली तर देवाची अनुभूती होते. देहूत येऊन याची प्रचिती आली आहे. तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ आणि कर्मभूमी आहे देहू. देहूत पांडुरंगाचा नित्य निवास आहे”, असं मोदी म्हणाले.

  • 7/15

    नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची केंद्रीय तसेच राज्यस्तरीय पथकाकडून सुरक्षिततेच्या सर्व बाबींची कसून तपासणी करण्यात आली आहे.

  • 8/15

    मंदिर परिसरात मोठा सभामंडप उभारण्यात आला आहे.

  • 9/15

    समारंभात संत तुकाराम पगडीने पंतप्रधानांचे स्वागत करण्यात आले.

  • 10/15

    पंतप्रधान मोदी हे दोन तास देहू परिसरात असणार आहेत.

  • 11/15

    पंतप्रधान मोदी हे मंगळवारी मुंबईत दोन कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

  • 12/15

    देहू येथील कार्यक्रम पार पडल्यावर पंतप्रधान मुंबईत दाखल होतील.

  • 13/15

    दुपारी त्यांच्या हस्ते राजभवनमध्ये ‘जल भूषण’ या नव्याने उभारण्यात आलेल्या राज्यपालांच्या निवासस्थानाची इमारत आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या दालनाचे उदघाटन मोदी यांच्या हस्ते होईल.

  • 14/15

    त्यानंतर ‘मुंबई समाचार’ या गुजराती दैनिकाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला मोदी हे उपस्थित राहतील.

  • 15/15

    (सर्व फोटो सौजन्य : ट्विटर)

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra ModiपुणेPuneपुणे न्यूजPune Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Prime minister narendra modi inaugurated maharashtra saint tukaram maharaj temple in dehu pune photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.