Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. cm eknath shinde and family did pooja of anand dighes tembinaka durga devi in thane rvs

PHOTOS: आनंद दिघेंच्या टेंभीनाका येथील देवीची मुख्यमंत्र्यांकडून सहकुटुंब पूजा, शिंदे कुटुंबीय देवीचरणी लीन

September 30, 2022 21:59 IST
Follow Us
  • धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यातील टेंभीनाक्यामध्ये सुरू केलेल्या नवरात्रोत्सव मंडळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब भेट दिली.
    1/9

    धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यातील टेंभीनाक्यामध्ये सुरू केलेल्या नवरात्रोत्सव मंडळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब भेट दिली.

  • 2/9

    पंचमीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सपत्निक पूजा केली. एकनाथ शिंदे यांचे पूत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नीने मनोभावे दुर्गा देवीची पूजा-अर्चना केली.

  • 3/9

    टेंभीनाक्यातील जय अंबे धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या नवरात्रोत्सव मंडळात मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब दुर्गा देवीची विधिवत पूजा केली.

  • 4/9

    १९७८ सालापासून सुरू करण्यात आलेल्या टेंभीनाका येथील नवरात्रोत्सवाची फार मोठी परंपरा आहे.

  • 5/9

    जय अंबे धर्मादाय विश्वस्त संस्थेच्यावतीने दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी करोना निर्बंधाशिवाय नवरात्रोत्सव साजरा होत असल्याने भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे.

  • 6/9

    धर्मवीर आनंद दिघे यांना देवीचा साक्षात्कार झाला होता असे बोलले जाते. या साक्षात्कारानुसार दिघेंनी मूर्ती बनवून घेतली. तशीच मूर्ती आजतागायत घडवली जात आहे.

  • 7/9

    आनंद दिघे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभीनाक्यामधील नवरात्रोत्सवाची परंपरा कायम ठेवली आहे.

  • 8/9

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टेंभीनाक्यामधील देवीची आरती करण्यात आली

  • 9/9

    (फोटो सौजन्य- खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या इन्स्टाग्रामवरुन)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeनवरात्री २०२४Navratri 2023

Web Title: Cm eknath shinde and family did pooja of anand dighes tembinaka durga devi in thane rvs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.