• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. new parliament building loksabha special session pm narendra modi speech women reservation bill pmw

Photos: नवी संसद..नवी लोकसभा..पाहा पहिल्यावहिल्या कामकाजाचे खास फोटो!

नव्या संसद भवनात आजपासून कामकाजाला सुरुवात झाली. लोकसभेत पहिल्या दिवसाचं कामकाज झालं, तेव्हा बहुसंख्येनं खासदार उपस्थित होते. ((सर्व फोटो – संसद टीवी ट्विटर हँडलवरून साभार)

Updated: September 19, 2023 15:42 IST
Follow Us
  • New-Parliament-building-special-session-loksabha-photos
    1/21

    बहुचर्चित सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील नव्या संसद भवनात आजपासून कामकाजाला सुरुवात झाली!

  • 2/21

    जुन्या संसद भवनातून सर्व सदस्य नव्या संसद भवनात चालत दाखल झाले!

  • 3/21

    पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी मंत्रीमंडळ पूर्ण संख्येनं यावेळी उपस्थित होतं.

  • 4/21

    सर्वपक्षीय खासदार यावेळी जुन्या संसद भवनातून नव्या संसद भवनाच्या दिशेने चालत गेले.

  • 5/21

    जुन्या संसद भवनात यावेळी संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर हे खासदार नव्या संसद भवनात दाखल झाले

  • 6/21

    एवढ्या मोठ्या संख्येनं खासदार संसद परिसरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी!

  • 7/21

    नव्या संसद भवनातील लोकसभेमध्ये सर्वात आधी सभागृह भरलं!

  • 8/21

    लोकसभेत सर्व सदस्यांनी ठरवून दिलेल्या जागी आसन ग्रहण केल्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली!

  • 9/21

    खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांच्या शेजारी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व त्यांच्या शेजारी गृहमंत्री अमित शाह बसल्याचं दिसून आलं.

  • 10/21

    लोकसभेच्या नव्या सभागृहात खासदारांप्रमाणेच प्रेक्षक, पत्रकार कक्षही सज्ज आहे.

  • 11/21

    चर्चेत व प्रसंगी वादात सापडलेला सेंगोलही लोकसभेत अध्यक्षांच्या खुर्चीच्या बाजूलाच लावण्यात आला आहे.

  • 12/21

    लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यावेळी अध्यक्षांसाठी तयार करण्यात आलेल्या खास खुर्चीवर बसले होते.

  • 13/21

    नव्या भवनातील पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदींनी महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडलं.

  • 14/21

    जवळपास सर्वपक्षीय खासदारांनी महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दर्शवला.

  • 15/21

    खासदारांच्या बाकांवर मागच्या बाजूला करण्यात आलेलं नक्षीकाम यावेळी लक्ष वेधून घेत होतं.

  • 16/21

    अध्यक्षांच्या मागच्या बाजूला असणारी सभागृहाच्या भिंतीवरील रचना लक्षवेधी अशीच ठरली!

  • 17/21

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी महिला आरक्षण विधेयकाची घोषणा करतानाच आपली भूमिका सभागृहासमोर मांडली.

  • 18/21

    लोकसभेत सर्व खासदारांना बसण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने रचना करण्यात आली आहे.

  • 19/21

    यावेळी मोदींनी सभागृहातील सत्ताधारी व विरोधी अशा सर्व खासदारांना उद्देशून भाषण केलं.

  • 20/21

    पहिल्या दिवशीच्या कामकाजासाठी सर्वपक्षीय खासदारांची जवळपास १०० टक्के उपस्थिती होती.

  • 21/21

    दुपारी २ वाजता लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं.

TOPICS
पंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modiमराठी बातम्याMarathi NewsलोकसभाLoksabhaसंसदParliamentसंसदीय अधिवेशनParliament Sessionसेंट्रल व्हिस्टा प्रकल्पCentral Vista Project

Web Title: New parliament building loksabha special session pm narendra modi speech women reservation bill pmw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.