-
गेल्या काही दिवसांपासून बहुप्रतिक्षित असलेल्या आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल आज १० जानेवारी रोजी लागला. (Loksatta Graphics)
-
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी या निकालाचं वाचन केलं. या निकालाच्या वाचनात सात महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले. ते पुढीलप्रमाणे पाहुयात. (महाराष्ट्र विधानसभा / युट्यूब)
-
२०१८ सालची शिवसेनेची घटनादुरुस्ती अवैध असल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाी १९९९ सालच्या घटनेचा आधार घेतला. यानुसार उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख म्हणून वैध ठरले नाहीत. परिणामी त्यांनी केलेली कारवाई वैध ठरवता येणार नाही असं म्हणत शिंदे गट खरी शिवसेना आहे, असं राहुल नार्वेकर म्हणाले. (संग्रहित छायाचित्र)
-
भरत गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती वैध ठरते, असंही राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं. (संग्रहित छायाचित्र)
-
एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी निवड वैध ठरते, असंही नार्वेकरांनी नोंदवलं. (फोटो – एकनाथ शिंदे/ एक्स)
-
ठाकरे गटाच्या नोटीसप्रमाणे शिंदे गटाचे सदस्य संपर्काच्या बाहेर गेल्याचं सादर पुराव्यांवरून सिद्ध होत नाही. (संग्रहित छायाचित्र)
-
भरत गोगावेलंची प्रतोदपदी नियक्ती वैध ठरवताना नार्वेकरांनी सुनील प्रभूंचं प्रतोदपद अवैध ठरवली.सुनील प्रभूंना पक्षासाठी कोणतीही बैठक बोलावण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे शिंदे गटाच्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी फेटाळली जात आहे, असं नार्वेकर म्हणाले. (संग्रहित छायाचित्र)
-
परिणामी शिंदे गटाचे १६ आमदार पात्र ठरले आहेत. (फोटो – एकनाथ शिंदे/ एक्स)
-
शिंदे गटाताली आमदारांना पात्र ठरवताना ठाकरे गटाच्या आमदारांना पात्र ठरवण्यात आलं आहे. (संग्रहित छायाचित्र )
सर्व आमदार पात्र, शिंदे गटच शिवसेना, व्हीपबाबत काय म्हणाले नार्वेकर? जाणून घ्या निकालातील सात महत्त्वाचे मुद्दे
Rahul Narvekar Verdict on Shivsena 16 MLA Disqualification : राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्र प्रकरणी निकालाचं वाचन केल. या निकालवाचनातील काही महत्त्वाचे मुद्दे
Web Title: Shivsena mla disqualification verdict seven important points in rahul narvekars verdict sgk