Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. general view of the 2000 metric ton arch bridge the bandra worli sea bridge is being connected today spl

PHOTOS : वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या ‘या’ महाकाय तुळईची आज होतेय सांधणी

या तुळईची लांबी, रुंदी आणि वजन किती? याबद्दल जाणून घ्या.

April 26, 2024 14:34 IST
Follow Us

  • Coastal Road with Bandra-Worli Sea Link
    1/10

    सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू परस्परांना जोडणारी बहुप्रतिक्षित तुळई अखेर बुधवारी रात्री ११ च्या दरम्यान वरळीत आणण्यात आली. प्रतिकूल हवामान स्थितीमुळे तुळई वरळीत आणण्याचे काम रखडले होते. Photo Credit- (Express photos by Sankhadeep Banerjee.)

  • 2/10

    ही तुळई गुरुवार, २६ एप्रिल रोजी पहाटे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला सांधली जाईल. या आव्हानात्मक मोहिमेसाठी साधारणपणे पाच ते सहा तासांचा अवधी लागेल.

  • 3/10

    नरिमन पॉइंटपासून वरळी-वांद्रे सागरी सेतूपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी पालिका मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) उभारत आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिण वाहिनी मार्गिका ११ मार्चपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. त्यानंतर, आता मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाचे वरळीकडील टोक जोडले जाईल.शुक्रवारी (२६ एप्रिल) प्रवाहकीय हवामानानुसार स्थापन करण्यात येणार आहे.

  • 4/10

    बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास न्हावा बंदरातून बार्जच्या साह्याने तुळई वरळीच्या दिशेने मार्गस्थ झाली. रात्री ८ वाजता समुद्रात उसळलेल्या लाटांमुळे काही वेळ कुलाब्यात प्रवास थांबविण्यात आला. त्यानंतर ती वरळीत आणण्यात आली.

  • 5/10

    पुढील टप्प्यात दुसऱ्या बाजूचीही तुळई बसवली जाईल. दोन्ही तुळई बसवल्यानंतर सागरी किनारा मार्ग आणि सागरी सेतू यांना जोडण्याचे काम मे २०२४ पर्यंत पूर्ण केले जाईल.

  • 6/10

    मुंबई किनारी मार्गावरून वांद्रे-वरळी सागरी सेतूकडे जाणाऱ्या मार्गावर दुसरी तुळईदेखील स्थापन करण्यात येणार आहे. ही दुसरी तुळई अडीच हजार मेट्रीक टन वजनाची असून १४३ मीटर लांब आणि २६ ते २९ मीटर रुंद आहे. ही तुळई स्थापन केल्यानंतर मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू पूर्णपणे जोडले जातील.

  • 7/10

    मुंबई पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू परस्परांना जोडण्यासाठी अवजड अशी पहिली तुळई न्हावा बंदरातून गुरुवारी समुद्रमार्गे वरळीत आणण्यात आली. शुक्रवार, २६ एप्रिल रोजी ही तुळई बसवण्याच्या कामास सुरुवात होईल.

  • 8/10

    या तुळईची लांबी १३६ मीटर आहे, उंची ३६ मीटर तर तुळईचे वजन १७०० टन आहे.

  • 9/10

    तुळईचे वैशिष्ट्ये
    देशात प्रथमच समुद्रात १३६ मीटर लांबीची धनुष्याकृती तुळई बसविण्यात येत आहे. जगात अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आल्याच्या घटना अत्यंत मोजक्याच आहेत.

  • 10/10

    वरळी येथील क्लिव्हलँड जेट्टीमधून मच्छीमारांच्या नौकानयन मार्गात व्यत्यय येणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी मोजक्याच सुट्या भागांचे (प्री-फॅब्रिकेटेड) पुलाचे नियोजन आणि बांधकाम करण्यात आले. ही बांधकामप्रणाली राबवत समुद्र व पर्यावरण घटकांना कमीत कमी अडथळा निर्माण होईल, याची काळजी घेण्यात आली.

TOPICS
बांद्रा वरळी सी लिंकBandra Worli Sea Linkमराठी बातम्याMarathi NewsमुंबईMumbai

Web Title: General view of the 2000 metric ton arch bridge the bandra worli sea bridge is being connected today spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.