• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. who is alakh pandey moves supreme court over neet ug 2024 grace marks physics wallah ceo net worth hrc

एकेकाळी गरिबीत काढले दिवस, आता हजारो विद्यार्थ्यांना देतोय शिक्षणाचे धडे, कोण आहे २००० कोटींचा मालक अलख पांडे?

‘फिजिक्सवाला’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि याचिकाकर्ते अलख पांडे यांनी वाढीव गुण हे स्वैरपणे देण्यात आल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली.

June 14, 2024 15:53 IST
Follow Us
  • who is physics co founder alakh pandey
    1/9

    NEET UG च्या निकालाबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर देशातील अनेक कोचिंग इन्स्टिट्यूटचे प्रमुख आणि विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत.

  • 2/9

    दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेले अलख पांडे चर्चेत आले आहेत. अलख पांडे हे अनेक NEET UG 2024 च्या परीक्षेत १५६३ विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेणाऱ्यांपैकी एक आहेत.

  • 3/9

    अलख पांडे ‘फिजिक्स वाला’चे संस्थापक आणि सीईओ आहेत. २०२० मध्ये अलख पांडे यांनी कमी बजेटमध्ये सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ‘फिजिक्स वाला’ची सुरुवात केली. हजारो विद्यार्थी इथे आयआयटी आणि नीटची तयारी करतात.

  • 4/9

    अलख पांडे भौतिकशास्त्र शिकवतात आणि त्यांची शिकवण्याची पद्धत विद्यार्थ्यांना खूप आवडते. NEET परीक्षेत पहिला क्रमांक मिळवलेले अनेक विद्यार्थीही त्यांच्या कोचिंग सेंटरचे आहेत.

  • 5/9

    अलख पांडे हे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी आहेत. त्यांचे बालपण आर्थिक संकटात गेले. त्यांना लहानपणापासूनच अभिनेता व्हायचं होतं, पण आर्थिक गरजांमुळे त्यांनी आठव्या इयत्तेपासूनच शिकवणीला सुरुवात केली.

  • 6/9

    आर्थिक अडचणींमुळे अलख पांडेंना अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करता आले नाही. अलीकडेच अलख पांडेंवर एक चित्रपटही बनवण्यात आला आहे, ज्यामध्ये त्याच्या संघर्षाची कहाणी दाखवण्यात आली आहे. २०१६ मध्ये त्यांनी यूट्यूब चॅनल सुरू केले.

  • 7/9

    अलख पांडे यांनी फिजिक्स वाला नावाचे यूट्यूब चॅनल सुरू केले. त्यांच्या चॅनेलचे लेक्चर व्हिडिओ विद्यार्थ्यांना खूप आवडले, ज्यामुळे त्यांच्या व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळाले.

  • 8/9

    त्यानंतर अलख यांनी एक मोबाइल ॲप तयार केले, ज्यामध्ये विद्यार्थी खूप कमी फी भरून ऑनलाइन कोचिंग क्लासेस घेऊ शकतात. अल्पावधीतच त्यांनी एक कंपनी उघडली आणि आज ते भारतात अनेक कोचिंग सेंटर चालवतात. त्यांची नेटवर्थ २००० कोटी रुपये आहे.

  • 9/9

    याशिवाय अलख पांडे अनेक मुलांना मोफत शिकवतात आणि गरजू मुलांना शिष्यवृत्तीही देतात. करिअरच्या सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करत, आर्थिक समस्यांशी लढा देत आज ते इथवर पोहोचले आहेत.
    (फोटो स्त्रोत: @PhysicswallahAP/Twitter)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto Galleryमराठी बातम्याMarathi Newsशिक्षणEducation

Web Title: Who is alakh pandey moves supreme court over neet ug 2024 grace marks physics wallah ceo net worth hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.