Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. gujarat floods claim over 35 lives 17800 people evacuated from flood affected areas spl

Photos : गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा कहर; ३५ जणांचा मृत्यू तर १७,८०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

Heavy Rainfall in Gujarat: राजकोटमध्ये मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर परिसरात पाणी साचले आहे.

Updated: August 30, 2024 15:01 IST
Follow Us
  • Gujarat Flood News in marathi, Heavy Rainfall In Gujarat
    1/12

    गुजरातमध्ये गेल्या तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे ३५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे द्वारका आणि वडोदरामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संभाव्य परिस्थिती आणि मदत कार्याच्या स्थितीवर चर्चा केली. गुजरात सरकारच्या विनंतीनुसार, भारतीय लष्कराने बचाव कार्यात मदत करण्यासाठी सहा तुकड्या पाठवल्या आहेत. आतापर्यंत १७,८०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. (पीटीआय फोटो)

  • 2/12

    भारतीय लष्कराचे जवान वडोदरा येथील पूरग्रस्त सामा परिसरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढत आहेत. (पीटीआय फोटो)

  • 3/12

    राजकोटमध्ये मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर परिसरात पाणी साचले आहे. (पीटीआय फोटो)

  • 4/12

    गुजरातमधील कच्छ, द्वारका, जामनगर, मोरबी, सुरेंद्रनगर, जुनागड, राजकोट, बोताड, गीर सोमनाथ, अमरेली आणि भावनगर जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. (पीटीआय)

  • 5/12

    वडोदरा मध्ये एक व्यक्ती एका महिलेला हातगाडीवरून रस्ता ओलांडण्यात मदत करत आहे. (पीटीआय फोटो)

  • 6/12

    जोरदार पावसामुळे राजकोटमधील रामनाथ महादेव मंदिरात पाणी साचले. (पीटीआय फोटो)

  • 7/12

    भाजपा नेत्या रिवाबा जडेजा यांनी जामनगरमधील अतिवृष्टीच्या पुरामुळे प्रभावित झालेल्या परिसरात जाऊन पाहणी केली. (पीटीआय फोटो)

  • 8/12

    काल २९ ऑगस्ट रोजी वडोदरातील सखल भागांतील नागरिकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. (पीटीआय फोटो)

  • 9/12

    गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती अधिकच बिकट होत आहे, दरम्यान, एक व्यक्ती घरातून पाणी रिकामे करताना. (पीटीआय फोटो)

  • 10/12

    गुजरातमध्ये सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील १८ जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. (पीटीआय)

  • 11/12

    मुसळधार पावसामुळे जामनगर, राजकोट आणि द्वारका येथील पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांच्या बचावकार्यात लष्कराचे जवान गुंतले आहेत. (पीटीआय फोटो)

  • 12/12

    हेही वाचा: ‘या’ सुपरस्टारने स्वतःच्या लग्नात १२ हजार फॅन्सना दिलेलं निमंत्रण, एका चाहत्याच्या कुटुंबाची ११ वर्षांपासून घेतोय काळजी

TOPICS
गुजरातGujaratपाऊसRainपूरFloodमराठी बातम्याMarathi Newsमुसळधार पाऊसHeavy Rainfall

Web Title: Gujarat floods claim over 35 lives 17800 people evacuated from flood affected areas spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.