• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. chatrapati shivaji maharaj international memorial in arabian sea mumbai gkt

Shivaji Maharaj Memorial : दहा वर्षांत सरकारं बदलली, पण प्रतीक्षा कायम; छत्रपतींच्या स्मारकाचा मुद्दा अद्याप निकाली निघेना!

Shivaji Maharaj Memorial : छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात भव्य स्मारक बांधण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कामाचे जलपूजनही झाले. मात्र, अद्यापही हे काम पूर्णत्वास गेलेले नाही.

Updated: October 6, 2024 17:12 IST
Follow Us
  • Chatrapati Shivaji Maharaj International Memorial
    1/2

    छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईतील अरबी समुद्रात उभारण्यात येण्याची घोषणा २०१४ मध्ये करण्यात आली होती. (फोटो-प्रातिनिधिक छायाचित्र)

  • 2/2

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ डिसेंबर २०१६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे जलपूजन केले होते.(फोटो-CMO MaharashtraX)

  • 3/2

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाचे कार्यादेश ऑक्टोबर २०१८ मध्ये देण्यात आले. मात्र, २०१९ मध्ये न्यायालयाने कामास स्थगिती दिली. ही स्थगिती आजही कायम आहे.(फोटो-प्रातिनिधिक छायाचित्र)

  • 4/2

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची एकही वीट अद्याप रचली गेलेली नाही. न्यायालयाच्या पुढील निर्णयावर या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे.(फोटो-प्रातिनिधिक छायाचित्र)

  • 5/2

    मुंबईतील अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारक जगातील सर्वात उंच स्मारक ठरणार असून शिवस्मारकाची उंची १९२ मीटरऐवजी २१० मीटरपर्यंत वाढवण्याचा निर्णयही झाला होता.(फोटो-CMO Maharashtra X)

  • 6/2

    मुंबईतील अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकासाठी पहिल्या टप्प्यात २३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. (फोटो-CMO Maharashtra X)

  • 7/2

    अरबी समुद्रातील शिवस्मारकाजवळ पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती देणारे दालन, पुस्तक प्रदर्शन, वस्तूसंग्रहालय असणार आहेत.(फोटो-CMO Maharashtra X)

  • 8/2

    आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी अरबी समुद्रात जाऊन स्मारक स्थळाची पाहणी करत सरकारवर टीका केली.

  • 9/2

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम अद्याप न झाल्यामुळे आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

  • 10/2

    “केंद्रात आणि राज्यात भाजपाचेच सरकार आहे, मग स्मारक का झालं नाही?”, असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला केला आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

TOPICS
भारतीय जनता पार्टीBJP

Web Title: Chatrapati shivaji maharaj international memorial in arabian sea mumbai gkt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.