• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. bags of political campaigner checked by eci in helicopter in maharashtra assembly elections 2024 sgk

बॅग तपासणीवरून वादंग; उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगेंसह ‘या’ नेत्यांचेही सामान तपासले

निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी आयोगाने राज्यभर स्थिर व भरारी सर्वेक्षण पथके तैनात केली आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी बॅगांची तपासणी केली जात आहे.

November 14, 2024 16:23 IST
Follow Us
  • निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘व्हीआयपी’ राजकीय नेत्यांच्या झाडाझडतीने सर्वपक्षीय नेते हैराण झाले आहेत. एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून आयोगाच्या आडून विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करीत आहेत. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाकडून आपल्याही बॅगांची तपासणी करण्यात आली असून, विरोधक केवळ राजकारण करीत असल्याचा प्रत्यारोप भाजपने केला. त्यामुळे आयोगाच्या नेतेमंडळींच्या तपासणी मोहीमेवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
    1/9

    निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘व्हीआयपी’ राजकीय नेत्यांच्या झाडाझडतीने सर्वपक्षीय नेते हैराण झाले आहेत. एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून आयोगाच्या आडून विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करीत आहेत. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाकडून आपल्याही बॅगांची तपासणी करण्यात आली असून, विरोधक केवळ राजकारण करीत असल्याचा प्रत्यारोप भाजपने केला. त्यामुळे आयोगाच्या नेतेमंडळींच्या तपासणी मोहीमेवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.

  • 2/9

    निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘व्हीआयपी’ राजकीय नेत्यांच्या झाडाझडतीने सर्वपक्षीय नेते हैराण झाले आहेत.

  • 3/9

    सर्वांत आधी उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात जाहीर सभेत तक्रार केली. त्यांची वणी आणि औसा येथील सभेला जाता बॅग तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांनी काही अधिकाऱ्यांचीच उलट तपासणी केली.

  • 4/9

    मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली तपासणी नाका येथे उद्धव ठाकरे यांचा ताफा निवडणूक पथकाने रोखला. त्यानंतर त्यांच्या ताफ्यात असलेल्या गाड्यांची तपासणीही केली. पोलिसांसह निवडणूक आयोगाचेही कर्मचारी गोव्यातून सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या प्रत्येक गाडीची तपासणी करीत आहेत. ठाकरे यांची बॅग सलग दोन दिवस तपासण्यात आली होती.

  • 5/9

    बॅग तपासणीवरून वादंग उठल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की आमच्याही बॅगा तपासण्यात आल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या आधी माझी बॅग तपासण्यात आली होती, असंही ते म्हणाले.

  • 6/9

    दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅग तपासणीदरम्यान त्यांच्या बॅगेत चकली, चिवडा वगैरे दिवाळी फराळ सापडले.

  • 7/9

    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही बॅगेची तपासणी करण्यात आली. एकनाथ शिंदे काल (१३ नोव्हेंबर) पालघर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांची बॅग तपासण्यात आली.

  • 8/9

    निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात आलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांच्याही बॅगेची तपासणी करण्यात आली.

  • 9/9

    नाना पटोलेंही यावेळी उपस्थित होते. त्यांच्याही बॅगेची तपासणी करण्यात आली.

TOPICS
निवडणूक २०२४Electionमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024विधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024

Web Title: Bags of political campaigner checked by eci in helicopter in maharashtra assembly elections 2024 sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.