-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी भारताच्या आदमपूर एअरबेसला भेट दिली आहे.
-
पाकिस्तानचे हवाई हल्ले परतवून लावणाऱ्या भारताच्या बहादूर वायू सैनिकांची यावेळी मोदींनी कौतुकाने पाठ थोपटली आहे.
-
भारत पाकिस्तान तणावादरम्यान भारताच्या वायूसेनेने सर्वात महत्वाची भूमिका बजावली.
-
ऑपरेशन सिंदूर दरम्यान डोळ्यांत तेल घालून भारताच्या हवाई हद्दीच वायूसेनेनं संरक्षण केलं.
-
या सगळ्याबद्दल पंतप्रधानांनी भारताच्या सैनिकांशी संवाद साधला.
-
यावेळी ‘भारत माता की जय’ या घोषणेने आसमंत दुमदुमून गेला.
-
पंतप्रधान मोदींनी या भेटीचे फोटो त्यांच्या एक्स अकाउंटवरुन शेअर केले आहेत. “मी आपल्या शूर हवाई योद्ध्यांना आणि सैनिकांना भेटलो. धैर्य, दृढनिश्चय, निर्भयतेचे प्रतीक असलेल्यांसोबत राहणे हा एक अतिशय खास अनुभव होता. आपल्या देशासाठी आपल्या सशस्त्र दलांनी जे काही केले त्याबद्दल भारत त्यांचा सदैव आभारी आहे”, असे ते म्हणाले.
-
दरम्यान काल संध्याकाळी ८ वाजता ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधानांनी २२ मिनिटांचे सविस्तर भाषण केले आहे.
-
(सर्व फोटो साभार- नरेंद्र मोदी एक्स) हेही पाहा- दहशतवाद, पाकिस्तान ते जागतिक समूह; सिंदूर मोहिमेवर पंतप्रधान मोदी २२ मिनिटांत काय बोलले? वाचा संपूर्ण भाषण
Photos : ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदी आदमपूर एअरबेसवर; जिगरबाज वायूदलाची घेतली भेट, पाहा फोटो
Operation sindoor: भारत पाकिस्तान तणावादरम्यान भारताच्या वायूसेनेने सर्वात महत्वाची भूमिका बजावली.
Web Title: Pm narendra modi adampur airbase visit after operation sindoor see photos spl