-
काल २६ मे २०२५ रोजी राज्यात मोसमी पावसाचे आगमन झाले. (एक्सप्रेस फोटो: अमित चक्रवर्ती )
-
या पहिल्याच मोसमी पावसाने मुंबई- पुणे या मोठ्या शहरांचे हाल हाल केले. (एक्सप्रेस फोटो: अमित चक्रवर्ती )
-
दोन्ही शहरांची अवस्था काय झाली? हे दर्शवणारे फोटो लोकसत्ताच्या छायाचित्रकारांनी टिपले आहेत. (एक्सप्रेस फोटो: गणेश शिरसेकर)
-
भूस्खलन झाले
मुंबईतील वाळकेश्वर येथील तीन बत्ती येथे भूस्खलन झाले. (एक्सप्रेस फोटो: गणेश शिरसेकर) -
त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर बॅरिकेट्स लावण्यात आले होते. (एक्सप्रेस फोटो: गणेश शिरसेकर)
-
पुणे
काल (सोमवारी) सलग तिसऱ्या दिवशी शहरात सतत पाऊस पडला. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन) -
हे पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील दृश्य आहे. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)
-
पावसात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)
-
काही चाकरमानी दुचाकीवरुन मार्ग काढताना दिसले. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)
-
तर काहीजण पायी चालत होते. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)
-
मुंबई
हे दृश्य मुंबइतील आहे. लोकल स्टेशनच्या फलाटांवर पाणी साचले होते. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन) -
त्यामुळे प्रवासी अडकून पडले. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)
-
लोकल वाहतूक बंद पडल्याने काही प्रवासी उतरून निघून जाताना दिसले. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)
-
लोकल सेवा ठप्प पडल्याने मुंबईकरांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागल्याचे पाहायला मिळाले. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)
-
ही दृश्ये मस्जीद बंदर स्टेशन परिसरातली आहेत. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)
-
काल झालेल्या संततधार पावसामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी साचले. (एक्सप्रेस फोटो: गणेश शिरसेकर)
-
वाहतूक कोंडी झाली आणि लोकल ट्रेन उशिराने धावल्या. (एक्सप्रेस फोटो: गणेश शिरसेकर)
-
यावेळी मुंबईतच रस्त्यानजीकची संरक्षक भींत कोसळली तर झाडांच्या फांद्याही तुटल्या. (एक्सप्रेस फोटो: गणेश शिरसेकर)
-
पाणी साचलेल्या रस्त्यावरून वाट काढताना महिला (एक्सप्रेस फोटो: गणेश शिरसेकर)
-
रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडीने प्रवासी हैराण झाले. (एक्सप्रेस फोटो: गणेश शिरसेकर)
-
मुंबईची बेस्टही पाण्यात अडकून पडली. (एक्सप्रेस फोटो: गणेश शिरसेकर)
-
मुंबईतल्या वाहतूक कोंडीचे आणखी एक दृश्य (एक्सप्रेस फोटो: गणेश शिरसेकर)
-
या फोटोतून रस्त्यावर किती पाणी साचले याचा अंदाज येत आहे. (एक्सप्रेस फोटो: गणेश शिरसेकर)
-
यावेळी नागरिकांनी रेन कोट, छत्री वापरत स्वसंरक्षण केले. (एक्सप्रेस फोटो: गणेश शिरसेकर)
-
रस्त्याला नदीचे स्वरूप आल्याचे या फोटोतून कळते. (एक्सप्रेस फोटो: गणेश शिरसेकर)
-
हे फोटो मुंबईतील सर्व परिसरातील आहेत. (एक्सप्रेस फोटो: गणेश शिरसेकर)
-
या फोटोंतून पावसाने मुंबईकरांचे किती हाल केले हे दिसून येत आहे. (एक्सप्रेस फोटो: गणेश शिरसेकर)
-
यावेळी रस्त्यावरच्या पाण्यामध्ये लहान वाहने बुडून गेली होती (एक्सप्रेस फोटो: गणेश शिरसेकर)
-
पाण्याच्या प्रवाहात एका प्रवाशाचा दुचाकीवरचा ताबा सुटला. (एक्सप्रेस फोटो: गणेश शिरसेकर)
-
पूर्ण दुचाकी पाण्याखाली गेल्याची पाहायला मिळाले. (एक्सप्रेस फोटो: गणेश शिरसेकर)
-
एमएमआर, नेरुळ येथे सकाळी मुसळधार पाऊस कोसळला तेव्हाचे हे फोटो आहेत (एक्सप्रेस फोटो: अमित चक्रवर्ती )
-
यावेळी परिसरात काळोख पसरला होता. (एक्सप्रेस फोटो: अमित चक्रवर्ती )
-
या स्थितीतून मार्ग काढताना चाकरमानी महिला. (एक्सप्रेस फोटो: अमित चक्रवर्ती )
-
चेंबूरमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. (एक्सप्रेस फोटो: अमित चक्रवर्ती )
-
ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मुसळधार पावसामुळे वाहतूक मंदावली होती. (एक्सप्रेस फोटो: अमित चक्रवर्ती )
-
ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूकीचे दृश्य (एक्सप्रेस फोटो: अमित चक्रवर्ती )
-
दरम्यान, महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस बरसेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (एक्सप्रेस फोटो: अमित चक्रवर्ती )
-
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा व पुण्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर, सिंधुदुर्ग, आहिल्यानगर, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत पुढील २४ तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (एक्सप्रेस फोटो: अमित चक्रवर्ती )
Photos : मान्सून आला रे आला अन् मुंबई- पुण्याचे हाल करुन गेला; पावसाच्या तडाख्याने शहरांची अवस्था कशी केली ते तुम्हीच पाहा…
Mumbai Pune Heavy Rains Photos: लोकल सेवा ठप्प पडल्याने मुंबईकरांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागल्याचे पाहायला मिळाले.
Web Title: Heavy rains in mumbai pune waterlogging traffic congestion and local train delays see exclusive photos spl