• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. elon musk new party who will lead elon musks new political party laura loomer names these three big names gkt

Elon Musk Political Party : एलॉन मस्क यांच्या राजकीय पक्षाचं नेतृत्व कोण करणार? लॉरा लूमर यांनी सांगितली तीन बड्या नेत्यांची नावं

Elon Musk Political Party : एलॉन मस्क यांनी राजकीय पक्षाची स्थापना केल्यानंतर आता ते डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देण्याची शक्यता आहे.

July 6, 2025 19:53 IST
Follow Us
  • Elon Musk Political Party
    1/10

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मस्क आणि ट्रम्प यांचा वाद जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

  • 2/10

    डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमध्ये एलॉन मस्क यांची महत्वाची भूमिका राहिली. एवढंच नाही तर ट्रम्प यांचे सर्वात विश्वासू म्हणून मस्क यांच्याकडे पाहिलं जात होतं.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

  • 3/10

    काही दिवसांपूर्वी मस्क हे ट्रम्प सरकारमधून बाहेर पडले आणि त्यानंतर दोघांमध्ये मतभेद सुरू झाले. यावरून दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

  • 4/10

    ट्रम्प आणि मस्क यांच्या वादाचं मूळ कारण म्हणजे अमेरिकत नुकतच मंजूर झालेलं ‘बिग ब्युटीफुल बिल’ हे विधेयक. याच विधेयकावरून त्यांच्यातील मतभेदाला सुरूवात झाली.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

  • 5/10

    त्यानंतर उद्योगपती एलॉन मस्क यांनी आज मोठा निर्णय घेत थेट नवीन राजकीय पक्षाची घोषणा केली. तसेच थेट राजकीय मैदानात उतरण्याचे संकेत दिले. (फोटो: द इंडियन एक्सप्रेस)

  • 6/10

    एलॉन मस्क यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा करत एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांना थेट राजकीय आव्हान दिलं आहे. त्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात चर्चा रंगली आहे.(फोटो : REUTERS)

  • 7/10

    एलॉन मस्क यांच्या नवीन राजकीय पक्षाचं नाव ‘अमेरिका पार्टी’ असं असल्याची घोषणा खुद्द एलॉन मस्क यांनी एक्सवरील पोस्टमध्ये केली आहे.(फोटो : REUTERS)

  • 8/10

    मस्क यांच्या राजकीय पक्षाचं नेतृत्व कोण करणार? याविषयी आता ट्रम्प यांच्या कट्टर समर्थक लॉरा लूमर यांनी ‘अमेरिका पार्टी’चे नेतृत्व करणाऱ्या तीन लोकांबाबत मोठी भविष्यवाणी केली. (फोटो-फायनान्शिअल एक्स्प्रेस)

  • 9/10

    टकर कार्लसन, मार्जोरी टेलर ग्रीन आणि थॉमस मॅसी हे लवकरच एलॉन मस्क यांच्या नव्या राजकीय पक्षाचा भाग होऊ शकतात असा दावा लॉरा लूमर यांनी केला आहे.(फोटो: द इंडियन एक्सप्रेस)

  • 10/10

    डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच्या वादानंतर एलॉन मस्क यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली असली तरी त्यांचा पुढील राजकीय प्लॅन काय आहे? याबाबत आता अनेकांना उत्सुकता लागली आहे. (फोटो: द इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
अमेरिकाAmericaअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षUS Presidentएलॉन मस्कElon Muskडोनाल्ड ट्रम्पDonald Trump

Web Title: Elon musk new party who will lead elon musks new political party laura loomer names these three big names gkt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.