• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. how many people have renounced indian citizenship in the last five years according to the statistics provided by the ministry of external affairs gkt

Indian Citizenship : गेल्या पाच वर्षांत किती लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं? धक्कादायक आकडेवारी समोर

Indian citizenship :२०२४ मध्ये तब्बल २ लाखांहून अधिक भारतीयांनी आपलं नागरिकत्व सोडलं असल्याची माहिती आता समोर आली आहे.

Updated: July 25, 2025 11:28 IST
Follow Us
  • Indian citizenship government data
    1/9

    Indian citizenship : गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये तब्बल २ लाखांहून अधिक भारतीयांनी आपलं नागरिकत्व सोडलं असल्याची माहिती आता समोर आली आहे. या संदर्भातील माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. (फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)

  • 2/9

    केंद्र सरकारने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, हा आकडा २०२४ च्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत थोडासा कमी आहे. या संदर्भातील माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून राज्यसभेत देण्यात आली आहे.(फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)

  • 3/9

    किती लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं? याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाला राज्यसभेत सादर करण्यास सांगण्यात आलं असता राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी ही आकडेवारी सादर केली.(फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)

  • 4/9

    कोणत्या वर्षांत किती लोकांनी नागरिकत्व सोडलं? : २०२४ मध्ये २,०६,३७८, २०२३ मध्ये २,१६,२१९, २०२२ मध्ये २,२५,६२०, २०२१ मध्ये १,६३,३७०, २०२० मध्ये ८५,२५६, २०१९ मध्ये १,४४,०१७ जणांनी भारतीय नागरिकत्व सोडलं असल्याची ही आकडेवारी समोर आली आहे. (फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)

  • 5/9

    दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाच्या या आकडेवारीवरून असं दिसून आलं की २०१९ पासून भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्या लोकांच्या संख्येत कोणतीही रेषीय वाढ झालेली नाही.(फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)

  • 6/9

    पण २०२४ मध्ये २,०६,३७८ भारतीयांचा आकडा २०२३ आणि २०२२ मध्ये नोंदवलेल्या आकडेवारीपेक्षा किंचित कमी आहे. मात्र, २०२१, २०२० आणि २०१९ मधील आकडेवारीपेक्षा जास्त आहे.(फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)

  • 7/9

    काही भारतीय नागरिक त्यांचं संपूर्ण आयुष्य परदेशात घालवतात, पण तिथले नागरिकत्व घेत नाहीत. तर दुसरीकडे असे अनेक लोक आहेत जे भारतीय नागरिकत्व सोडून परदेशात स्थायिक होतात. (फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)

  • 8/9

    अनेकदा विचारलं जातं की भारतीय नागरिकत्वाचा त्याग करण्यासाठी काय प्रक्रिया असते. मात्र, त्यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते. (फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)

  • 9/9

    दरम्यान, अर्जदाराने भारतीय नागरिकत्वाचा त्याग करण्यासाठी दाखल केलेल्या अर्जानंतर संबंधित कागदपत्राची पडताळल्याच्या पोचपावतीच्या ३० दिवसांनंतर संबंधित प्रमाणपत्र मंजूर केले जातं.(फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)

TOPICS
आंतरराष्ट्रीय बातम्याInternational Newsकेंद्र सरकारCentral Governmentभारतीय संविधानIndian Constitution

Web Title: How many people have renounced indian citizenship in the last five years according to the statistics provided by the ministry of external affairs gkt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.