-   Mumbai – Pune Expressway Maharashtra: मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली जवळ झालेल्या भीषण अपघातात १ जण ठार तर जवळपास २५ जण जखमी झाले आहेत. (Express Photos) 
-  खंडाळा घाटात मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रेलरने १५ ते १६ वाहनांना जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. 
-  पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रेलरचे खंडाळा घाटात तीव्र उतारावर ब्रेक निकामी झाल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. 
-  ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे ट्रेलर वरील नियंत्रण सुटले. 
-  ट्रेलर समोरील वाहनांना ठोकर देत तसाच पुढे जात राहिला, दिड ते दोन किलोमीटरच्या पट्ट्यात या ट्रेलरने एकामागून एक वाहनांना धडक दिली. 
-  यामध्ये लहान वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. 
-  अपघाताची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथके, पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अपघात ग्रस्तवाहनांमधील जखमींना बाहेर काढून खोपोली आणि पनवेल येथील रुग्णालयात दाखल केले. 
-  या अपघातात एक प्रवाश्याचा मृत्यू झाला असून काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. 
-  सध्या २० ते २५ प्रवाश्यांना खोपोली येथील नगर पालिकेच्या रुग्णालयात आणले आहे. 
-  दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली असून अपघात ग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू आहे. 
Photos: वीकेंडला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; १६ वाहने एकमेकांवर धडकली, कारण काय?
या अपघातात एक प्रवाश्याचा मृत्यू झाला असून काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
Web Title: Mumbai pune expressway 26 july 2025 danger accident 16 vehicles collide container truck brakes failed sdn