-
Happy Independence Day 2025: भारत आज आपला ७९ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे. (सर्व फोटो सौजन्य : PMO/X)
-
दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर (Red Fort, Delhi) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यानंतर पंतप्रधान देशाला संबोधित करत आहेत.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लागोपाठ १२व्या वेळा तिरंगा झेंडा (Independence Day 2025) फडकवला.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज स्वातंत्र्यदिनी पांढऱ्या रंगाचा सदरा परिधान करत त्यावर केशरी रंगाचे नेहरु जॅकेट आणि फेटा बांधला होता.
-
७९व्या स्वतंत्रता दिवसाच्या निमीत्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लाल किल्ल्यावर गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
-
नरेंद्र मोदींनी लाला किल्ल्यावरून ऑपरेशन सिंदूरच्या वीर जवानांना मानवंदना दिली.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतंत्रता दिवसाच्या निमित्ताने लाल किल्ला येथून दिलेल्या भाषणात दोन मोठ्या घोषणा (PM Narendra Modi Speech) केल्या आहेत.
-
नरेंद्र मोदी म्हणाले की या दिवाळीला सरकार जीएसटी रिफॉर्म्स (PM Modi Announces Next Generation GST Reforms By Diwali) घेऊन येईल. यामुळे लोकांना करांमध्ये दिलासा मिळेल.
-
याबरोबरच पंतप्रधान मोदी यांनी विकसित भारत रोजगार योजना लागू करण्याची घोषणा देखील केली.
-
या योजनेअंतर्गत प्रायव्हेट सेक्टरमध्ये पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना सरकारकडून १५००० रुपये दिले (PM Launched Pradhan Mantri Viksit Bharat Rojgar Yojana) जातील. त्या कंपन्यांना देखील सरकार प्रोत्साहन देईल. या योजनेमुळे ३.५ कोटी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
भगवा फेटा, नेहरु जॅकेट अन् पांढरा सदरा; स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं ध्वजारोहण!
India’s 79th Independence Day 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लागोपाठ १२व्या वेळा तिरंगा झेंडा फडकवला.
Web Title: India 79th independence day 2025 pm narendra modi flag hoisting red fort delhi announces new schemes photos sdn