Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. ganesh visarjan 2025 pune manache ganpati visarjan miravnuk dhol tasha svk

Photos: ढोल-ताशांचा गजर, महिलांची फुगडी, भाविकांची गर्दी; पुण्यातील मानाचे गणपती विसर्जनाच्या मार्गावर

Pune Ganpati Visarjan 2025 Updates: अनंत चतुर्दशीनिमित्त पुणे-मुंबईसह राज्यभर गणेश विसर्जनाच्या मिरवणुका काढल्या जात आहेत.

Updated: September 6, 2025 16:27 IST
Follow Us
  • pune ganesh visarjan 2025
    1/13

    पुण्याचा मानाचा पहिला गणपती कसबा गणपती आज पारंपरिक जल्लोषात विसर्जन मिरवणुकीसाठी निघाला असून, लक्ष्मी रोडवर भव्य शोभायात्रा सुरू आहे. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)

  • 2/13

    लक्ष्मी रोडवर भक्तांनी रंगीबेरंगी रांगोळी काढली आहे. त्यामुळे परिसर उत्सवी रंगात न्हाऊन निघाला आहे. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)

  • 3/13

    भक्तांनी गर्दी करून बाप्पाच्या दर्शनासाठी एकच उत्साह निर्माण केला असून, सर्वत्र केशरी ध्वज आणि गुलालाची उधळण दिसत आहे. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)

  • 4/13

    मिरवणुकीत महिला मंडळी पारंपरिक पोशाखात फुगडी खेळत बाप्पाचे स्वागत करीत आहेत; तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण नृत्य करत आहे. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)

  • 5/13

    पुण्याच्या मानाच्या पहिल्या गणपतीचे विसर्जन पाहण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी झाली आहे. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)

  • 6/13

    ढोल-ताशांच्या गजरात, झांजांच्या निनादात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला आहे. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)

  • 7/13

    मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी आज पारंपरिक जल्लोषात विसर्जन मिरवणुकीसाठी निघाला असून, रोडवर भक्तांचा सागर उसळला आहे. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)

  • 8/13

    पारंपरिक पोशाखातील कार्यकर्ते गणपती बाप्पाच्या पालखीला खांद्यावर घेत घोषणांच्या गजरात पुढे सरकत आहेत. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)

  • 9/13

    केशरी फेटे बांधलेले कार्यकर्ते आणि गुलालाची उधळण यांमुळे संपूर्ण वातावरण उत्सवी रंगात न्हाऊन निघाले आहे. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)

  • 10/13

    मिरवणुकीत लहान मुलेही रंगून गेली असून, पालकांच्या खांद्यावर बसून बाप्पाचे दर्शन घेत आहेत. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)

  • 11/13

    महिलांनी पारंपरिक नऊवारी साडीत नाचगाणी आणि टाळ-झांजांच्या साथीने बाप्पाला निरोप दिला. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)

  • 12/13

    पुण्याचा मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी या भव्य शोभायात्रेत हजारो भाविक सहभागी झाले आहेत. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)

  • 13/13

    रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी गणपतीचे दर्शन घेतले, तर छत व बाल्कनीतूनही बाप्पाला निरोप देत आहेत. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)

TOPICS
गणेश विसर्जन २०२५Ganesh Visarjan 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025

Web Title: Ganesh visarjan 2025 pune manache ganpati visarjan miravnuk dhol tasha svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.