-
Mumbai Rain Updates : यंदाचा मोसमी पाऊस आता परतीचा प्रवास करतो आहे. याबाबतची माहिती हवामान विभागाने रविवारी जाहीर केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून सध्या मुंबई पुणे या शहरांमध्ये काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)
-
मुंबईत रात्री उशीरा मुसळधार पावसाने सुरुवात केल्यानंतर पहाटे त्याचा वेग मंदावला. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)
-
परंतू या पावसामुळे मुंबईतील रस्ते पुन्हा एकदा जलमय झालेेले पाहायला मिळाले आहेत. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)
-
ही मुंबईतील आजची ताजी दृश्य आहेत. रस्त्यांवर सगळीकडे पाणीच पाणी साचले आहे. दुचाकी वाहनं तर अर्धी पाण्यात बुडत आहेत. इतकं पाणी भरलेलं पाहायला मिळत आहे. (एक्सप्रेस फोटो- गणेश शिरसेकर)
-
सकाळपासून रिमझिम सुरू असल्याने बरीचशी वाहतूक सेवेची साधणं विस्कळीत होताना यावेळी पाहायला मिळताहेत. (एक्सप्रेस फोटो- गणेश शिरसेकर)
-
चाकरमान्यांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऑफिसला पोहोचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला आहे. (एक्सप्रेस फोटो- गणेश शिरसेकर)
-
लोकल ट्रेनबाबतही माहिती समोर आली आहे. लोकल सेवा विस्कळीत झाली असून काही रेल्वे स्थानकांदरम्यान पाणी साचले आहे. (एक्सप्रेस फोटो- गणेश शिरसेकर)
-
हे दृश्य मुंबईतील वरळी नाका येथील आहे. मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने वाहने मार्गस्थ होण्यास अडचण येत आहे. (एक्सप्रेस फोटो- गणेश शिरसेकर)
-
दरम्यान येत्या काही तासांत मुंबईत पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत मेघगर्जनेसह पाऊस पडेल. हेही पाहा-हरियाणातील जन्म, गुजरातपूर्वी ‘या’ राज्याचे राज्यपाल; कोण आहेत महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल आचार्य देवव्रत?
Mumbai Rain Updates: मुंबईत काही ठिकाणी मुसळधार; वरळीत रस्त्यावर साचलं पाणी, लोकल सेवाही विस्कळीत…
Heavy Rain Alert in Mumbai : सकाळपासून रिमझिम सुरू असल्याने बरीचशी वाहतूक सेवेची साधणं विस्कळीत होताना यावेळी पाहायला मिळताहेत.
Web Title: Mumbai rain updates waterlogged due to heavy rain at worli naka local trains disturbed spl